आश्रमशाळेत विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू

3581
सुनिल चंदर खांडवी

पालघर जिल्ह्यातील मोखाडामधील हिरवे पिंपळपाडा आश्रमशाळेत नववीत शिकणाऱ्या सुनिल चंदर खांडवी या १५ वर्षाच्या मुलानं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडलीय. पण सुनिलचा मृत्यू संशयास्पद असल्याचा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केलाय. जांभूळमाथा इथं राहणाऱ्या सुनिल याचा मृतदेह मुलींच्या बाथरूममध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. ही घटना रविवारी घडली आहे.

हे ही वाचा…

सोमवारी सुनीलची आई त्याला भेटण्यासाठी आश्रमशाळेत गेली पण सुनिलला कालच सुट्टी दिल्याचं मुख्यधापकांनी सांगितलं. पण सुनील घरी आला नसल्याने त्याची शोधाशोध केल्याने हा धक्कादायक प्रकार उघड झालाय. आश्रमशाळा अधिक्षकांनी सुनीलच्या नावाची बनावट सही करून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप सुनिलच्या वडिलांनी केला आहे. पोलिसांनी आता अधिक तपास सुरू केलाय. आश्रमशाळा अधिक्षक आणि मुख्यधापकावर फौजदारी कारवाई करण्याची मागणी मुलाचे वडील चंदर महादू खांडवी यांनी केली आहे.