Home > News Update > पाकिस्तान चा गिलगीट-बाल्टीस्तान स्वतंत्र राज्याचा दर्जा, भारताची भूमिका काय?

पाकिस्तान चा गिलगीट-बाल्टीस्तान स्वतंत्र राज्याचा दर्जा, भारताची भूमिका काय?

एका बाजूला चीनने केलेली घुसखोरी तर दुसरीकडे वादग्रस्त प्रदेश असलेल्या गिलगिट-बाल्टिस्तान ला पाकिस्तानने स्वतंत्र दर्जा राज्याचा दर्जा देण्याची केलेली घोषणा असो... मोदी सरकार काय भूमिका घेणार?

पाकिस्तान चा गिलगीट-बाल्टीस्तान स्वतंत्र राज्याचा दर्जा, भारताची भूमिका काय?
X

पाकिस्तान ने 1947-48 आक्रमण करुन ताब्यात घेतलेल्या गिलगीट-बाल्टीस्तान प्रदेशावरुन पाकिस्तान बरोबरच भारतात वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. पाकिस्तानने गिलगीट बाल्टीस्तानला स्वतंत्र प्रांताचा दर्जा देण्याची घोषणा केली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी या संदर्भात रविवारी केलेल्या घोषणेत

"गिलगिट-बाल्टिस्तान यांना घटनात्मक हक्क देण्यात येतील, नोव्हेंबरमध्ये येथे निवडणुका होणार आहेत निवडणूक प्रक्रियेमुळे ते सध्या गिलगिट-बाल्टिस्तानसाठी विकास पॅकेजची घोषणा किंवा चर्चा करू शकत नाहीत. आम्ही हा निर्णय संयुक्त राष्ट्र सुरक्षा मंडळाच्या ठराव लक्षात घेऊन घेतला आहे''. तर इकडे भारताने पाकिस्तानच्या या निर्णय़ाचा तीव्र शब्दात निषेध केला आहे.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्त म्हणाले, पाकिस्तानने बेकायदेशीर आणि जबरदस्तीने भारताच्या भूभागावर अतिक्रिमण केलं आहे. हे भारत कधीच स्वीकारणार नाही. जम्मू-काश्मीर आणि लडाख या केंद्रशासित प्रदेशासह गिलगिट-बाल्टिस्तान हा भारताचा अविभाज्य भाग असल्याचे मी पुन्हा सांगतो. " असं म्हणत पाकिस्तान ला खडसावले आहे.

मात्र, एका बाजूला चीनने केलेली घुसखोरी तर दुसरीकडे वादग्रस्त प्रदेश असलेल्या गिलगिट-बाल्टिस्तान ला पाकिस्तानने स्वतंत्र दर्जा राज्याचा दर्जा देण्याची केलेली घोषणा असो... मोदी सरकार काय भूमिका घेणार? असा सवाल आता उपस्थित होतो.

Updated : 2 Nov 2020 2:53 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top