Home > News Update > जे.जे. हॉस्पिटलमध्ये राजीनामा बाँम्ब, पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने, डॉ. रागिणी पारेख आणि डॉ. सायली लहानेंसह 9 जणांचे तडकाफडकी राजीनामे

जे.जे. हॉस्पिटलमध्ये राजीनामा बाँम्ब, पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने, डॉ. रागिणी पारेख आणि डॉ. सायली लहानेंसह 9 जणांचे तडकाफडकी राजीनामे

पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने (Tatyarao Lahane) यांच्यासह 9 जणांनी मुंबईतल्या जे.जे. हॉस्पीटलमधील (JJ Hospital) आपल्या पदांचे राजीनामे दिले आहेत. हॉस्पीटलचे अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे (Dr. Pallavi Sapale) यांच्या कारभारावर आक्षेप घेत या 9 जणांनी अधिष्ठाता सापळेंवर गंभीर आरोपही केले आहेत. जे.जे. हॉस्पीटलचे अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे या मागील एका वर्षापासून मानसिक त्रास देत असल्याची लेखी तक्रार करत या सर्व 9 वरिष्ठ डॉक्टरांनी आपले राजीनामे दिले आहेत. यासंदर्भात राजीनामे देणा-या डॉक्टर्सनी एक निवेदनही जारी केले आहे. यात राजीनामा देण्यामागील भुमिका स्पष्ट करत संपूर्ण घटनाक्रमही नमूद केलाय.

जे.जे. हॉस्पिटलमध्ये राजीनामा बाँम्ब, पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने, डॉ. रागिणी पारेख आणि डॉ. सायली लहानेंसह 9 जणांचे तडकाफडकी राजीनामे
X

गेल्या काही दिवसांपूर्वी आपण निवासी डॉक्टर संघटना ( मार्ड ) (MARD) यांनी पाठवलेले प्रेस रिलीज पाहिलेच असेल. नेत्रविभागातील प्रथम व द्वितीय वर्षाच्या निवासी डॉक्टरांनी केलेल्या तक्रारीचे आम्ही शासनास मुद्देनिहाय ऊत्तर दिलेले आहे. १९९५ पुर्वी रोज फक्त ३० रुग्ण येणाऱ्या या विभागात आज ३००-४०० रुग्ण दररोज येतात. या विभागाच्या कामाची दखल घेऊन केंद्र शासनाने २००८ मध्ये विभागास विभागीय नेत्रचिकित्सा संस्थेचा" (Regional Institute of Ophthalmology ) दर्जा दिला. या विभागात महाराष्ट्र भरातुन व इतर राज्यातुन रुग्ण ऊपचार करुन घेण्यासाठी येतात. डोळ्यामधील दुर्धर आजार किंवा शस्त्रक्रियेनंतर गुंतागुंत निर्माण झालेले रुग्ण शेवटची अपेक्षा घेऊन आत्मविश्वासाने या विभागात ऊपचारासाठी येतात. या विभागात वेगवेगळ्या अतिविशेषोपचार सेवा दिल्या जातात. (उदा- मोतीबिंदु, काचबिंदु, मेडीकल व सर्जीकल रेटीना, बूबूळावरील शस्त्रक्रिया, लेसिक, लहान मुलांच्या डोळ्यावरील उपचार, तिरळेपणा, डोळ्यांचा कर्करोग, आकुलोपस्टी, सर्व प्रकारच्या तपासण्या) या सर्व सेवा त्या त्या तज्ञामार्फत रुग्णांना देणारा हा महाराष्ट्रातील एकमेव विभाग आहे. तसेच सुट्टीच्या दिवशी आदिवासी व ग्रामीण भागात जाऊन येथील नेत्रतज्ञ गरीब रुगणांची सेवा करत आहेत. मागील २८ वर्षात ६९२ शिबीरे घेऊन तीस लाख रुग्णावर उपचार केले आहेत.

सन २०१६ मध्येही निवासी डॉक्टर संघटनेने या विभागाच्या विरोधात संप पुकारला होता. त्यातील १२ पैकी ११ डॉक्टरांनी क्षमा मागून तक्रार परत घेतली. त्यावेळेस ही आमच्यावर झालेला अन्याय आम्ही रुग्णांसाठी सहन केला. आता पुन्हा दि. २२ मे २०२३ रोजी सध्या कार्यरत असणाऱ्या प्रथम व द्वितीय वर्षाच्या २८ निवासी डॉक्टरांनी अधिष्ठाता यांचेकडे मार्ड संघटने मार्फत तक्रार केली. या तक्रारीचे स्पस्टीकरण डॉ. गजानन चव्हाण सह अधिष्ठाता यांनी नेत्रविभाग प्रमुखांना मागितले. परंतु अधिष्ठाता यांनी विभागाचे स्पष्टीकरण पोहचण्यापुर्वीच चौकशी समिती नेमली. या समितीत ३१ मे रोजी सेवानिवृत होत असलेले डॉ. अशोक आनंद यांची चौकशी समिती अध्यक्ष म्हणुन नियुक्ती केली. डॉ. अशोक आनंद यांची महिला छळ प्रकरणी डॉ. रागिनी पारेख यांनी यापुर्वी चौकशी केली आहे. तसेच त्यांनी डॉ तात्याराव लहाने, डॉ. रणजीत माणकेश्वर, डॉ भंडारवार, डॉ एकनाथ पवार, डॉ श्रीमती अभीचंदानी यांचेविरुध्द अॅट्रॉसीटी अंतर्गत पोलीसात तक्रार दाखल केली होती. या वरुन असे लक्षात येते की डॉ. अशोक आनंद यांचे समितीचे अध्यक्ष म्हणून अधिष्ठाता यांनी केलेली नियुक्ती करणे म्हणजेच विभागातील अध्यापकांना आकस बुध्दीने त्रास देण्यासाठी व त्यांची बदनामी केलेली आहे हे सिध्द होते. या विभागामार्फत डॉ अशोक आनंद यांच्या ऐवजी ईतर कोणताही अध्यक्ष नियुक्त करावा अशी विनंती करण्यांत आली आहे. परंतू तसे न करता अधिष्ठाता यांनी चौकशी तशीच सुरु ठेवली.

विभागामार्फत निवासी डॉक्टरांनी दिलेल्या तक्रारीचे मुद्येनिहाय स्पष्टीकरण विभागातील सर्व अध्यापक, तीस-या वर्षातील निवासी डॉक्टर, तंत्रज्ञ, नर्सेस व कक्ष सेवकांच्या सहीने देण्यात आले. गेली २८ वर्षे याविभागातील डॉक्टर्स रात्रदिवस रुग्णसेवा करीत आहेत. त्यामुळे विभागाचे नाव जगभरात प्रसिध्दीस आले आहे. सहा महिन्या पुर्वीविभागात पदव्यूत्तर अभ्यासक्रम शीकण्यासाठी रुजू झालेल्या नीवासी डॉक्टरांचे तक्रारीवरुन आमचे म्हणणे न ऐकताच चौकशी सुरु ठेवण्यात आली आहे.

अधिष्ठाता यांनी मागील वर्षभरात याविभागाला कोणतीही मदत केलेली नाही. वारंवार अध्यापकांना त्रास देण्याचा प्रयत्न केला. तरीही याविभागातील अध्यापक अपमान सहन करुन रुग्णांच्या सेवेसाठी काम करीत आहेत. पुन्हा आता कसलीही चुक नसतांनाविभागातील अध्यापकांची बदनामी करण्यात येत आहे.

डॉ. लहाने हे मोतिबिंदू मुक्त महाराष्ट्र कार्यक्रमाचे काम करीत आहेत. सेवानिवृती नंतरही डॉ. लहाने व सर्व अध्यापक रात्रदिवस रुग्ण सेवा देत आहेत. असे असले तरी त्यांचे वेतन अदयापहि अधिष्ठाता यांनी अदा केलेले नाही. त्यांना शासकीय निवासस्थानासाठी सात लाख रुपये दंड लावून ते रिक्त करण्यास सांगीतले. तरीही रुग्णांशी असलेल्या बांधीलकीमुळे ते काम करीत आहेत.

आपणांस विनंती करण्यांत येते की मी प्राध्यापक व विभाग प्रमुख तसेच विभागात काम करीत असलेले सर्व अध्यापक खुप माणसीक तणावातून जात आहोत. यामुळे आमच्या आरोग्यावर देखील विपरित परिणाम होत आहे. यास्तव विभागातील आम्ही सर्व अध्यापक आमच्या पदावरुन आज दिनांक ३१ मे २०२३ रोजी राजीनामा देत आहोत.

आम्ही या पुढेही रुग्णसेवा सुरळीत सुरु रहाण्यासाठी खालील मागण्या करीत आहोत- १. गेल्या वर्षभरापासून त्रास देणा-या अधिष्ठाता यांचेविरुध्द योग्य ती कारवाई करण्यात यावी.

२. ईतर निवासी डॉक्टरांना भडकावणा-या डॉ. सार्बिक डे, डॉ. संस्कृती प्रसाद व डॉ. स्मृती पांडे या तीन्ही निवासी डॉक्टरांचे पी जी रजिस्ट्रेशन रदद करावे. ईतर निवासी डॉक्टरांना बेशीस्त वर्तन केल्या बददल कडक समज द्यावी.

३. डॉ. रागीणी पारेख यांनी गेल्या २८ वर्षात रात्रदिवस काम केले आहे. त्यांची स्वेच्छानिवृत्ती मंजूर करावी.

४. त्याच प्रमाणे सर्व अध्यापकांचे राजीनामे मंजूर करुन त्यांना कार्यमुक्त करण्यात यावे.

पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांच्यासह जे.जे. हॉस्पीटलच्या 9 वरिष्ठ डॉक्टर्सनी राजीनामे दिल्याच्या घटनेबाबत अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांनी त्यांची भुमिका स्पष्ट केली. डॉ. सापळे म्हणाल्या, " या 9 डॉक्टरांचे राजीनामे अजून मिळालेले नाहीत. त्यामुळे याप्रकरणी जास्त बोलणार नसल्याचं डॉ. सापळे यांनी सांगितलं.

राजीनामा दिलेले वरिष्ठ डॉक्टर्स

१) डॉ. तात्याराव लहाने

२) डॉ. रागिणी पारेख

३) डॉ.प्रीतम सामंत

४) डॉ. स्वरंजीत सिंग भट्टी

५) डॉ. हेमालीनी मेहता

६) डॉ.शशी कपूर

७) डॉ. दिपक भट

८) डॉ. सायली लहाने

९) डॉ. अश्विन बाफना

Updated : 1 Jun 2023 2:36 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top