Home > News Update > World Bank Presindent : पद्मश्री अजय बंगा वर्ल्ड बँकेच्या अध्यक्षपदी

World Bank Presindent : पद्मश्री अजय बंगा वर्ल्ड बँकेच्या अध्यक्षपदी

वॉशिंग्टन – जागतिक बँकेच्या अध्यक्षपदी भारतीय वंशाचे अजय बंगा यांची सर्वानुमते निवड करण्यात आलीय. कार्यकारी संचालकंनी एकमतानं बग्गा यांची निवड केलीय. बंगा यांची नियुक्ती ही पाच वर्षांसाठी करण्यात आलीय.

World Bank Presindent : पद्मश्री अजय बंगा वर्ल्ड बँकेच्या अध्यक्षपदी
X

जनरल अटलांटिक चे उपाध्यक्ष म्हणून अजय बंगा यांनी सर्वाधिक काळ काम केलंय. सुमारे २४ हजार कर्मचारी असलेल्या मास्टकार्ड या बहुराष्ट्रीय कंपनीचे उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केलंय. त्यांच्याच नेतृत्वाखाली मास्टरकार्ड ने सेंटर फॉर इन्क्लुसिवन ग्रोथ ची सुरूवात केली. त्यातून कंपनीनं शाश्वत आर्थिक विकास करायला सुरूवात केली. ते इंटरनॅशनल चेंबर ऑफ कॉमर्सचे मानद अध्यक्ष म्हणून त्यांनी २०२० ते २०२२ पर्यंत काम पाहिले होते. जनरल अटलांटिक यांचे सल्लागार म्हणूनही त्यांनी काम केलंय. याशिवाय त्यांनी विविध आंतरराष्ट्रीय संस्थांसोबतही काम केलेलं आहे.

अजय बंगा हे सायबर रिडनेस इंस्टिटयुट चे सह संस्थापक आहेत याशिवाय न्यूयॉर्कच्या इकॉनॉमिक क्लबचे उपाध्यक्षपदावरही राहिलेले आहेत. त्यांना फॉरेन पॉलिसी असोशिएशन तर्फे २०१२ मध्ये सन्मानित करण्यात आलंय. २०१६ मध्ये त्यांना भारत सरकारनं पद्मश्री पुरस्कारानंही सन्मानित केलेलं आहे. याशिवाय बिझनेस कॉन्सिल फॉर इंटरनॅशनल अंडरस्टँडिंग ग्लोबल लिडरशीप अवार्ड २०१९ ने सन्मानित कऱण्यात आलंय. याशिवाय सिंगापूरचा प्रतिष्ठेचा पूरस्कार ही त्यांना २०२१ मध्ये प्रदान करण्यात आलाय.

Updated : 3 Jun 2023 12:10 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top