Home > News Update > Padma Awards 2024 : व्यंकय्या नायडू, साउथ सुपरस्टार चिरंजीवी यांना पद्मविभूषण तर राम नाईक यांना पद्मभूषण; वाचा संपूर्ण यादी

Padma Awards 2024 : व्यंकय्या नायडू, साउथ सुपरस्टार चिरंजीवी यांना पद्मविभूषण तर राम नाईक यांना पद्मभूषण; वाचा संपूर्ण यादी

Padma Awards 2024 : व्यंकय्या नायडू, साउथ सुपरस्टार चिरंजीवी यांना पद्मविभूषण तर राम नाईक यांना पद्मभूषण; वाचा संपूर्ण यादी
X

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची (Padma Awards 2024 Winners) घोषणा झाली असून त्यामध्ये माजी उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू (Venkaiah Naidu) आणि साऊथचा सुपरस्टार चिरंजिवी (Chiranjeevi) यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. तर राम नाईक, संगीतकार प्यारेलाल आणि अभिनेता मिथून चक्रवर्ती (Mithun Chakraborty) यांना पद्मभूषण पुरस्काराने गौरवण्यात आलं. एकूण पाच जणांचा पद्मविभूषण तर 17 जणांचा पद्मभूषण पुरस्काराने गौरव करण्यात आला. तर 110 जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.

अभिनेता चिरंजीवी यांनी ' ही बातमी ऐकल्यानंतर मी आवाक झालो, हे लोकांचे अमूल्य प्रेम आहे, आयुष्यभर तुमचा ऋणी राहील ' असं म्हणत चाहत्यांचे आभार मानले

पद्मविभूषण

वैंकया नायडू

चिरंजिवी

वैजंयतीमाला बाली

ब्रिंदेश्वर पाठक (मरणोत्तर)

पद्मा सुब्रमण्यम

पद्मभूषण (महाराष्ट्रातील मानकरी)

हुरमुसजी कामा

अश्विन मेहता

राम नाईक

दत्तात्रय मायायो उर्फ राजदत्त

प्यारेलाल शर्मा

कुंदन व्यास

पद्मश्री (महाराष्ट्रातील मानकरी)

उदय देशपांडे

मनोहर डोळे

झहिर काझी

चंद्रशेखर मेश्राम

कल्पना मोरपारिया

शंकरबाबा पापलकर

या 132 जणांमध्ये 30 महिलांचा समावेश आहे, चक 8 जण परदेशी, एनआयआर, पीआयओ, ओसीआय या प्रवर्गातील आहेत. तसेच 9 जणांना मरणोत्तर पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.



Updated : 25 Jan 2024 8:47 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top