Home > News Update > नाशिक येथे ऑक्सिजन गळती, २२ रुग्णांचा मृत्यू

नाशिक येथे ऑक्सिजन गळती, २२ रुग्णांचा मृत्यू

सध्या देशात ऑक्सिजनची कमतरता असताना नाशिकमध्ये ऑक्सिजन गळतीची घटना घडली आहे. नाशिक महानगरपालिकेतील जाकिर हुसैन रुग्णालयात ऑक्सीजनच्या टॅंक लिकेज झाल्याची प्राथमिक माहिती आहे. ऑक्सिजन प्लांन्ट लिकेज झाल्याने मोठा गोंधळ उडाला होता.

प्रशासनाने खबरदारी म्हणून रुग्णांना तात्काळ दुसऱ्या हॉस्पिटल मध्ये हलवल आहे. रेस्क्यू टीम घटना स्थळी पोहोचली आहे. त्यांनी लिकेज ऑक्सिजन टॅंक रिपेअर केला आहे.

सध्या महाराष्ट्राला सध्या मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची गरज आहे. दरम्यान रुग्णालयात व्हेंटिलेटरवर असणाऱ्या २३ पैकी २२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Updated : 21 April 2021 10:11 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top