Home > News Update > ऑक्सिजन कमतरतेने 20 लोकांचा मृत्यू, 200 रुग्णांचा जीव टांगणीवर

ऑक्सिजन कमतरतेने 20 लोकांचा मृत्यू, 200 रुग्णांचा जीव टांगणीवर

ऑक्सिजन कमतरतेने 20 लोकांचा मृत्यू, 200 रुग्णांचा जीव टांगणीवर
X

सध्या देशात ऑक्सिजनच्या कमतरता आहे. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे दिल्लीत 20 लोकांचा मृत्यू झाला आहे. दिल्ली चे लोक सलग 5 व्या दिवशी ऑक्सिजनच्या कमतरतेचा सामना करत आहेत. दिल्लीमधील जयपूर गोल्डन रुग्णालयात 20 लोकांचा ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे मृत्यू झाला आहे. रुग्णालय प्रशासनाने ही माहिती दिली आहे.

इंडियन एक्सप्रेस ने या संदर्भात वृत्त दिलं आहे. डॉ. बलूजा यांनी दिलेल्या माहितीनुसार हे रुग्ण गंभीर आजारी होते. या सर्व रुग्णांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. ऑक्सिजनचा प्रेशर कमी होता. मात्र, या सर्व रुग्णांचा मृत्यू त्या काळात झालेला नाही. असं हॉस्पिटलने म्हटलं आहे.

डॉ. बालुजा यांनी माध्यमांशी बोलताना इथं फक्त 30 मिनिटे पुरेल इतकाच ऑक्सिजन शिल्लक असल्याची माहिती दिली आहे. रुग्णालायत 200 रुग्ण असून त्यातील 80 रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. तर 35 अति दक्षता विभागात आहेत. रुग्णालयाच्या मते सध्या 3600 लिटर ऑक्सिजनची आवश्यकता आहे. मात्र, रात्री 12 पर्यंत 1500 लिटरच ऑक्सिजन मिळाला.

Updated : 24 April 2021 8:26 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top