Positive news : ऑक्सफर्डच्या लसीची मानवी चाचणी पुन्हा सुरू होणार

345

कोरोनावरील लसीची मानवी चाचणी ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि एस्ट्राझेन्का कंपनीने पुन्हा एकदा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या लसीच्या चाचणी दरम्यान प्रयोग करण्यात आलेल्या एका व्यक्तीची प्रकृती बिघडल्याने या लसीच्या चाचण्या ६ सप्टेंबर रोजी थांबवण्यात आल्या होत्या. ब्लूमबर्गने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.

ऑक्सफर्ड विद्यापीठाने आपल्या निवेदनात याबद्दलची माहिती दिलेली आहे. ब्रिटनच्या औषध नियंत्रण प्राधिकरणाने या चाचणी दरम्यान एक व्यक्ती आजारी पडल्या बाबत चौकशी केली आणि या चौकशीनंतर या लसीची चाचणी पुन्हा सुरू करणं सुरक्षित आहे, अशी शिफारस केली असल्याचं सांगण्यात आले आहे. पण या चौकशी बाबत अधिक माहिती यामध्ये देण्यात आलेली नाही.

कोरोनाच्या संकटावर सगळ्यात विश्वासार्ह लस म्हणून ऑक्सफर्डच्या या लसीकडे पाहिलं जात आहे. त्यामुळे या लसीची चाचणी पुन्हा सुरू होणार ही मोठी दिलासादायक बातमी ठरलेली आहे. दरम्यान ब्रिटन बाहेर इतर ठिकाणी या लसीच्या ज्या चाचण्या सुरू होत्या त्या देखील थांबविण्यात आलेल्या आहेत. पण या चाचण्यांबद्दल या निवेदनामध्ये कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. भारतामध्ये सिरम इन्स्टिट्यूटमध्ये देखील या लसीच्या चाचण्या सुरू होत्या, पण त्यादेखील गुरुवारी थांबविण्यात आलेल्या आहेत. पण आता भारतातील चाचण्या आता लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे.

 

Comments