Home > News Update > शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी निघालेली आक्रोश पदयात्रा

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी निघालेली आक्रोश पदयात्रा

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी निघालेली आक्रोश पदयात्रा
X

बीड : स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काढण्यात आलेली आक्रोश पदयात्रा आज बीडमध्ये दाखल झाली आहे. वडवणी तालुक्यातून या यात्रेस सुरुवात झाली होती, मागील आठवड्यात झालेल्या पावसाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, त्याबरोबरच गतवर्षीचा पीक विमा देण्यात यावा. यासाठी ही यात्रा काढण्यात आली होती.

आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयावर ही यात्रा पोहचली असून मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी शेतकऱ्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली, नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना हेक्‍टरी 50 हजार रुपयांची नुकसान भरपाई मिळावी या प्रमुख मागण्यांसाठी ही पदयात्रा काढली आली होती. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास बिंदुसरा नदी पात्रात आत्मक्लेश आंदोलन करू असा इशारा देण्यात आला.

दरम्यान यावेळी बोलताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाधिकारी कुलदीप करपे म्हणाले की, शासन- प्रशासनाकडून शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्यात येत आहे.अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. आस्मानी संकटाचा सामना करणाऱ्या बळीराजा ठोस आणि भरघोस अशी मदत शासनाने करावी, जोपर्यंत शासनाचे प्रतिनिधी आमच्या पदयात्रेला सामोरे जात नाही तोपर्यंत हा मोर्चा असाच सुरू राहील असं करपे यांनी म्हटले आहे.

Updated : 17 Sept 2021 12:20 PM IST
Next Story
Share it
Top