Home > News Update > बच्चू कडुंना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश; शिवसेनेला पाठींबा दिल्यामुळे भाजपाचे कटकारस्थान?

बच्चू कडुंना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश; शिवसेनेला पाठींबा दिल्यामुळे भाजपाचे कटकारस्थान?

बच्चू कडुंना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश; शिवसेनेला पाठींबा दिल्यामुळे भाजपाचे कटकारस्थान?
X

अमरावती | प्रहार संघटनेचे अध्यक्ष व अमरावती जिल्ह्यातील अचलपूर मतदार संघाचे आमदार बच्चू कडु यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दिल्यामुळे भाजपने बच्चू कडु विरोधात कटकारस्थान रचल्याचा आरोप होत आहे. वर्षभरापूर्वी मुंबई मंत्रालयात बच्चू कडु यांनी एका अधिकाऱ्यावर लैपटॉप उगारला होता. त्यामुळे आता वर्षभरा नंतर बच्चू कडु यांना मरीन ड्राईव्ह पोलीस ठाणे मुंबई पोलिसांनी मुंबई न्यायालयाची नोटीस बजावली व ४ नोव्हेंबर रोजी न्यायालयात हजर राहण्याचा फर्मान बजावला आहे.

मंत्रालयात माहिती तंत्रज्ञान संचालक प्रदीप पी यांना आमदार बच्चू कडू यांनी लॅपटॉप फेकून मारण्याचा प्रयत्न केला होता. "स्पर्धा परीक्षा विद्यार्थी महामोर्चा" राज्य शासनाच्या स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी महापरीक्षा पोर्टल बंद करण्यात यावे. अशी मागणी बच्चू कडु यांनी केली होती. त्यामुळे बच्चू कडु यांच्या विरोधात २७/९/२०१९ रोजी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाणे मुंबई पोलिसात ३५३,१४७,५०४,५०६ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले होते.

आता या विरोधात पोलिसांनी वर्षभरा नंतर तपास झाल्याचे सांगत येत्या 4 नोव्हेंबर रोजी मुंबई महानगर न्यायालयात हजर राहणाची नोटिस बजावली आहे. याचं दिवशी बच्चू कडु विरोधात दोषारोपपत्र सादर करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. पण बच्चू कडु यांनी आपल्या दोन आमदारासह शिवसेनेला समर्थन देऊन भाजपाला विरोध केल्याने भाजपाने कटकारस्थान रचल्याचा आरोप होत आहे.

त्यामुळे बच्चू कडु यांना जाणीवपूर्वक पोलीस व न्यायालयाच्या धमक्या देत कोंडीत पकडण्याचा प्रयत्न भाजपाने केला असल्याचा आरोप केला जात आहे.

Updated : 3 Nov 2019 3:29 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top