Home > News Update > 'नो लसीकरण नो पेट्रोल'ला मनसेचा विरोध तर पेट्रोल पंप असोसिएशन न्यायालयात जाणार

'नो लसीकरण नो पेट्रोल'ला मनसेचा विरोध तर पेट्रोल पंप असोसिएशन न्यायालयात जाणार

नो लसीकरण नो पेट्रोलला मनसेचा विरोध तर पेट्रोल पंप असोसिएशन न्यायालयात जाणार
X

राज्यातील लसीकरण मोहीम वेगाने वाढविण्यासाठी राज्य प्रशासन आणि स्थानिक प्रशासन वेगवेगळे नियम तयार करत आहेत. मात्र प्रशासनाच्या काही कठोर नियमांना आता विरोध होताना पाहायला मिळत आहे. औरंगाबाद जिल्ह्यात राबवली जात असलेली 'नो लसीकरण नो पेट्रोल मोहिमे'ला आता राजकीय आणि पेट्रोल पंप असोसिएशन कडून विरोध केला जात आहे. तर आज यावर निर्णय न झाल्यास न्यायालयात जाणार असल्याचा इशारा पेट्रोल पंप असोसिएशनकडून देण्यात आला आहे.

गेल्या आठवड्यात औरंगाबाद जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी 'नो लसीकरण नो पेट्रोल' असे आदेश काढले होते. त्याचाच एक भाग म्हणून रविवारी औरंगाबादच्या बाबा पेट्रोल पंप वर आदेशाची अंमलबजावणी होत नसल्याने जिल्हाधिकारी चव्हाण यांनी कारवाई करत पंप सील केला होता.

तर जिल्हाधिकारी यांच्या या आदेशाला मनसेकडून निदर्शने करून विरोध करण्यात आला. तसेच यासाठी लोकांना काही आणखी कालावधी वाढवून देण्याची मागणी मनसेकडून करण्यात आली. तर पेट्रोल पपंवर लसीकरण प्रमाणपत्र तपासणीसाठी प्रशासनाने प्रशासकीय नियोजन करावे अशी मागणी पेट्रोल पंप असोसिएशनकडून करण्यात आली आहे. यावर आम्ही संध्याकाळपर्यंत वाट पाहू अन्यथा याविरोधात न्यायालयात जाणार असल्याचं पेट्रोल पंप असोसिएशनकडून सांगण्यात आले आहे.

Updated : 22 Nov 2021 12:15 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top