Home > News Update > रायगड मध्ये भिडेंच्या सभेला विरोध, ऑल इंडिया पँथर सेनेचे पोलिसांना निवेदन

रायगड मध्ये भिडेंच्या सभेला विरोध, ऑल इंडिया पँथर सेनेचे पोलिसांना निवेदन

रायगड मध्ये भिडेंच्या सभेला विरोध, ऑल इंडिया पँथर सेनेचे पोलिसांना निवेदन
X

रायगड - शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे यांच्या पेण रायगड येथे दि. 6 ऑगस्ट 2023 रोजी आयोजित आली आहे. परंतु या कार्यक्रमास ऑल इंडिया पँथर सेनेच्या वतीने तसेच विविध सामाजिक बहुजन संघटनांकडून कडाडून विरोध दर्शविण्यात आला आहे. भिडे यांच्या कार्यक्रमास परवानगी देऊ नये या मागणीचे निवेदन रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे तसेच पेण पोलीस निरीक्षक पोळ यांना देण्यात आलंय.

काही दिवसांपासून मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे नावाचे गृहस्थ बहुजन महापुरुषांबद्दल राष्ट्रपित्यांबद्दल सतत अपमानकारक वक्तव्ये करीत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय. सातत्याने काही ना काही वादग्रस्त विधाने केल्याने सामाजिक सलोखा देखील ढासळत आहे. बहुजन तरुणांची माथी भडकवून राज्यात अराजकता माजविण्याचे काम भिडे करीत असल्याचे ऑल इंडिया पँथर सेनेच म्हणणं आहे.

यावेळी ऑल इंडिया पॅंथर सेनेचे रायगड जिल्हाध्यक्ष नरेश दादा गायकवाड, पेण तालुकाध्यक्ष सागर वाघमारे, पेण तालुका उपाध्यक्ष उदय दामले, बौद्ध महासभा कोकण रायगड जिल्हा कार्याध्यक्ष शेखर जोशी, बौद्ध महासभा कोकण पेण तालुका अध्यक्ष रामजी गायकवाड साहेब ऑल इंडिया पॅंथर सेना पेण शहराध्यक्ष प्रदीप सताने, पेण तालुका युवक अध्यक्ष मोरे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Updated : 4 Aug 2023 4:03 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top