Home > News Update > संसदेत आजही गोंधळ सत्र ?

संसदेत आजही गोंधळ सत्र ?

संसदेत आजही गोंधळ सत्र ?
X

बारा खासदारांना निलंबित केल्याच्या मुद्द्यावरुन सलग चौथ्या दिवशी संसदेत विरोधक आक्रमक असून गोंधळात आज पुन्हा कामकाज होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. खासदार निलंबनावरुन विरोधक पहील्या दिवसापासून आक्रमक आहेत. गोंधळात लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज सुरु आहे. धरण सुरक्षा आणि प्रजनन तंत्रज्ञानाच्या नियमनाचे विधेयकावर चर्चा अपूर्ण आहे. कोरोना महामारी आणि ओरीओक्रॉन वेरीअंटच्या मुद्द्यावरील उर्वरीत चर्चा आज लोकसभेच्या कामकाज पटलावर दाखवण्यात आली आहे.

विरोधकांना संसद सभागृहाबरोबरच संसदेच्या बाहेर निलंबनाच्या मुद्द्यावरुन आक्रमक धोरण स्विकारले आहे. लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभा सभापतींनी वारंवार आवाहन करुनही विरोधक कामकाज सुरळीत चालू देत नाहीत. दरम्यान संसद कामकाजाच्या पहिल्या दिवशी वादग्रस्त कृषी कायदे परत घेण्यासंबधीच्या विधेयकला राष्ट्रपतीनी मंजूरी दिली आहे.

Updated : 2 Dec 2021 10:11 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top