Home > News Update > एका नगरपरिषदेतील भ्रष्टाचारावरुन विधानसभेत खडाजंगी

एका नगरपरिषदेतील भ्रष्टाचारावरुन विधानसभेत खडाजंगी

एका नगरपरिषदेतील भ्रष्टाचारावरुन विधानसभेत खडाजंगी
X

यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी नगर परिषदेमध्ये कंत्राटदार आणि अभियंता यांनी मिळून गैरव्यवहार केल्याची तक्रार तिथले नगरसेवक लक्ष्मण पठारे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. याच मुद्द्यावरुन विधानसभेत मंगळवारी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. या कंत्राटदाराने केलेल्या मान्सूनपूर्व कामांची चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली आहे. निविदा काढताना काही तफावत दिसून येते असं मंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिले, त्यावर सुधीर मुनगंटीवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने निलंबित करावे अशी मागणी केली. ही चर्चा सुरू असताना नाना पटोले यांनी उभे राहून सभागृहात चुकीच्या पद्धतीने चालवले जात आहे असा आरोप करत विरोधकांवर टीका केली.

Updated : 2 March 2021 8:08 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top