Home > News Update > मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यावर विरोधकांचे टीकास्त्र

मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यावर विरोधकांचे टीकास्त्र

मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यावर विरोधकांचे टीकास्त्र
X

Mumbai : दावोस दौऱ्याचा होणाऱ्या खर्चावरून विरोधकांकडून जोरदार टीका होतेय, शिष्टमंडळातील १० प्रतिनिधी हे दावोस दौऱ्यावर जाणार आहेत. दरम्यान यावर विरोधकांकडून आरोप करण्यात येत होते हे आरोप आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फेटाळून लावले. जागतिक आर्थिक परिषदेत राज्याचे प्रभावी ‘ब्रॅण्डिंग’ करून सर्वदूर गुंतवणूक आणण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील राज्याचे शिष्टमंडळ दावोसला रवाना झाले. यातून विक्रमी म्हणजेचं तीन लाख दहा हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात येणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.


‘वऱ्हाड निघालय दावोसला’

दावोस दौऱ्यावर मुख्यमंत्र्यांवर विरोधकांनी टीका सुरू ठेवली आहे. ‘वऱ्हाड निघालय दावोसला’ असे म्हणत शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी टीका केली आहे. दरम्यान "दौऱ्याचा खर्च आणि शिष्टमंडळाच्या आकाराबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

जनतेच्या पैशांची खुलेआम लुट

यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील खरमरीत टीका केली आहे. " दावोस ला जाण्यासाठी ३४ कोटींचा खर्च केला जाणार आहे. जनतेच्या पैशांची खुलेआम लुट केली जातेय. अंगणवाडी भगिनी आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करीत आहेत. पण सरकार त्यांच्याकडे लक्ष देण्यास तयार नाही. तर दुसरीकडे मात्र करोडो रुपये सहलीसाठी उधळले जात असल्यांची" टीका सुळे यांनी केली आहे

Updated : 16 Jan 2024 3:55 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top