Home > News Update > हिवरा मध्यम प्रकल्पात केवळ 10 टक्केच पाणीसाठा शिल्लक

हिवरा मध्यम प्रकल्पात केवळ 10 टक्केच पाणीसाठा शिल्लक

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा येथील प्रसिद्ध असलेल्या हिवरा मध्यम प्रकल्पातील जलसाठा 10 टक्केच शिल्लक असून प्रकल्पातील उपयुक्त जलसाठ्याबाबत शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या चिंतेत आहेत.

हिवरा मध्यम प्रकल्पात केवळ 10 टक्केच पाणीसाठा शिल्लक
X

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा येथील प्रसिद्ध असलेल्या हिवरा मध्यम प्रकल्पातील जलसाठा 10 टक्केच शिल्लक असून प्रकल्पातील उपयुक्त जलसाठ्याबाबत शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या चिंतेत आहेत. या प्रकल्पावर परिसरातील 15 आणि इतर 10 गावांच्या पाणीपुरवठा अवंलबुन आहे.

अनेक गावांच्या पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन याच हिवरा मध्यम प्रकल्पावर आहेत. तसेच या प्रकल्पामुळे परिसरातील बागायतदार शेतकरी मोठ्या संख्येने अवलंबून आहे. हा प्रकल्प दरवर्षी शंभर टक्के भरुन ओसंडून वाहत असतो. मात्र यावर्षीच्या पावसाने हुलकावणी दिली असल्याने प्रकल्पाच्या जलसाठ्यात वाढच झाली नाही. सध्या हिवरा मध्यम प्रकल्पात 10 टक्के इतकाच जलसाठा शिल्लक आहे. हिवरा मध्यम प्रकल्पाच्या उगमस्थानी डोंगराळ भागातील परिसरात दमदार पाऊस झाला नसल्याने प्रकल्पाने तळ गाठला आहे .त्यामुळे शेतकरी व ग्रामस्थ चिंतातूर आहे.

एकीकडे राज्यात जोरदार पावसाने हजेरी लावल्याने अनेक जिल्ह्यात महापुराची परिस्थिती निर्माण झाली असताना जळगाव जिल्ह्यात दरवर्षीपेक्षा कमी पाऊस झाल्याने अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे.सोबतच अनेक गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामळे येथील शेतकरी आणि ग्रामस्थ दमदार पावसाच्या प्रतिक्षेत आहेत.

खडकदेवळा येथील हिवरा माध्यम प्रकल्प हा हिवरा नदीवर बांधण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या उगमस्थानी डोंगराळ भागात चांगला पाऊस झाल्यास या प्रकल्पाच्या जलसाठ्यात वाढ होत असते.याच हिवरा माध्यम प्रकल्पाच्या उगमस्थानी पासून आता दोन ते तीन छोटे मोठे धरण बांधण्यात आल्याने हे धरण जेव्हा ओसंडून वाहतील तेव्हाच या प्रकल्पातील पाण्याची पातळी मध्ये वाढ होत असते मात्र प्रकल्पांच्या उगमस्थानीच दमदार पाऊस झालाच नसल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. येणाऱ्या काळात प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रात मुसळधार पाऊसाची अपेक्षा शेतकरी व ग्रामस्थ व्यक्त केली आहे

Updated : 1 Aug 2021 11:16 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top