Home > News Update > कांद्याचे भाव पडल्याने कांदा उत्पादकांची आर्थिक कोंडी

कांद्याचे भाव पडल्याने कांदा उत्पादकांची आर्थिक कोंडी

बागलाण तालुक्‍यासह कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा या परिसरात उत्पादित होणाऱ्या उन्हाळी कांद्याचे दर पडलेले असल्याने कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत.

कांद्याचे भाव पडल्याने कांदा उत्पादकांची आर्थिक कोंडी
X

बागलाण तालुक्‍यासह 'कसमादे' म्हणून परिचित असलेल्या कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा या परिसरात उत्पादित होणाऱ्या उन्हाळी कांद्याचे दर ऑगस्ट उजाडून देखील पडलेले असल्याने कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत सापडला आहे.

ज्यावेळी नवीन कांद्याचे कोणत्याच परिसरात फारशे उत्पादन येत नाही, अशावेळी 'कसमादे' परिसरात चाळीत साठविलेला कांदा देशभरातील बाजारपेठ काबीज करतो. दरवर्षी या भागातील कांद्याला बाजारात चांगला भाव मिळतो, दरवर्षी याच काळात चाळीतील साठवलेल्या कांद्याला 2100 रूपये प्रतीक्विंटल भाव मिळतो. मात्र, यंदा याच कांद्याला 1500 ते 1600 रूपये भाव मिळत असल्याचे कांदा उत्पादक शेतकरी प्रवीण गोसावी यांनी सांगितले आहे.

सोबतच सततच्या पावसामुळे आणि वातावरणातील बदलामुळे चाळीतील कांदा देखील खराब होत असल्याने शेतकरी आधीच अडचणीत असताना, बाजारभाव देखील मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे.

Updated : 6 Aug 2021 9:09 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top