अयोध्येत राम मंदिरातील एका पूजाऱ्याला कोरोना

अयोध्येतील राम मंदिराचे भूमिपूजन ५ ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. पण त्याआधी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. राम मंदिरातील एका पूजाऱ्याला आणि बंदोबस्तावरील ४ पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती जिल्हाधिकारी अनुज झा यांनी दिली आहे.

भूमिपूजन सोहळ्यात कोरोनाची भीती असू नये म्हणून सध्या पूर्ण काळजी घेतली जात असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. त्यासाठी संपूर्ण अयोध्येत पुन्हा पुन्हा कोरोनाच्या चाचण्या घेतल्या जात आहेत. गुरूवारी १०० जणांच्या अँटिजन टेस्ट करण्यात आल्या होत्या. त्यापैकी चार पोलिस कर्मचारी आणि एका पुजाऱ्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे, अशी माहिती देखील जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेली आहे.

हे ही वाचा…

नवीन शैक्षणिक धोरण : ‘शिक्षणाच्या आयचा घो’

कोरोनाचं नाही, माणसांचं जास्त भय वाटतंय !

राज्यांना GSTचा वाटा देण्यास केंद्र सरकार असमर्थ?

पुजाऱ्याला कोरोना झाला असला तरी इथला भूमिपूजनाचा कार्यक्रम होणार असल्याची माहिती देखील जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेली आहे. या कार्यक्रमात कोरोनाचा कोणताही प्रादुर्भाव होऊ नये म्हणून पूर्ण काळजी घेतली जात असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे.

राम मंदिराच्या या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती राम मंदिर न्यासाकजून देण्यात आलेली आहे . त्याचबरोबर सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह काही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना देखील इथे बोलावले जाणार असल्याची चर्चा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here