Home > News Update > पत्नीवर चारित्र्याच्या संशयातून एसआरपीएफ जवानाने केला गोळीबार ; एक जण जागीच ठार

पत्नीवर चारित्र्याच्या संशयातून एसआरपीएफ जवानाने केला गोळीबार ; एक जण जागीच ठार

पत्नीवर चारित्र्याच्या संशयातून एसआरपीएफ जवानाने केला गोळीबार ; एक जण जागीच ठार
X

सोलापूर : सोलापुरातील बार्शी तालुक्यातील भातांबारे गावातील गोरोबा महात्मे या एसआरपीएफ जवानाने पत्नीवरील चारित्र्याच्या संशयावरून केलेल्या गोळीबारात एक जण जागीच ठार झाला आहे. तर एकावर सोलापुरातील खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. पत्नीवर असणाऱ्या चारित्र्याच्या संशयावरून बोलण्यासाठी जवानाचे सासरचे मंडळी काल भातांबारे गावी आले होते, मात्र, बोलणं फिसकटल्यामुळे जवानाने रागाच्या भरात सरकारी पिस्टलचे चार राउंड फायर केले, यामध्ये जवानाच्या मेहुण्याच्या मित्राचा जागीच मृत्यू झाला आहे. नितीन भोसकर असं मृत व्यक्तीचं नाव आहे. तर बालाजी महात्मे असं जखमी व्यक्तीचं नाव आहे.

या प्रकरणी गोरोबा महात्मे या एसआरपीएफ जवानाला वैराग पोलिसांनी रात्रीच अटक केली आहे. घटनास्थळावरून एक सरकारी पिस्टलसह 26 जिवंत काडतूस जप्त करण्यात आली आहेत. वैराग पोलीस स्टेशनमध्ये आरोपी गोरोबा महात्मेवर भारतीय दंड संहिता कलम 302,307,504 आणि शस्त्र अधिनियम कलम 3,25,27 प्रमाणे गुन्हे दाखल केला आहेत.

Updated : 21 Oct 2021 12:06 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top