Home > News Update > दुसरी मुलगी नको म्हणून गर्भपात, बीड जिल्ह्यात सत्र सुरूच

दुसरी मुलगी नको म्हणून गर्भपात, बीड जिल्ह्यात सत्र सुरूच

दुसरी मुलगी नको म्हणून गर्भपात, बीड जिल्ह्यात सत्र सुरूच
X

बीड जिल्ह्यात अवैध गर्भलिंग निदान आणि अवैध गर्भपाताचे सत्र सुरूच आहे. पहिली मुलगी असल्याने दुसऱ्यांदा मुलगा व्हावा एका विवाहित महिलेचा अवैधपणे गर्भपात करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. मुलगाच हवा या हट्टापायी कुटुंबीयांनी एका डॉक्टरला हाताशी धरून बेकायदेशीरपणे गर्भलिंगनिदान केले. त्यानंतर गर्भात मुलगीच आहे हे लक्षात आल्यानंतर पती आणि सासूच्या सांगण्यावरून त्या डॉक्टरने गर्भ अक्षरशः कापून बाहेर काढल्याचा धक्कादायक प्रकार परळीमध्ये घडला आहे.

मुलगी असो वा मुलगा, मला गर्भपात नको, माझ्या बाळाला मारू नका असा आक्रोश करणाऱ्या मातेकडेही त्या डॉक्टरने दुर्लक्ष केले. अखेर त्या मातेच्या फिर्यादीवरून पती, सासू, डॉक्टर आणि अन्य एका व्यक्तीवर परळीच्या संभाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 2020 साली लग्न झाल्यापासून पती आणि सासू आपला मुलासाठी छळ करत होते, असा आरोप पीडित महिलेने केला आहे.

दुसऱ्यांदा गर्भवती असलेल्या त्या महिलेकडून मुलगाच हवा असा हट्ट पती आणि सासूने धरला होता, सोनोग्राफी करून गर्भलिंग निदान केल्यानंतर मुलगी असली तर गर्भपात करायचा असा हट्ट् त्यांनी धरला. यानंतर तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून पती आणि सासूने जून महिन्यात डॉक्टर स्वामीसोबत संपर्क साधला व डॉक्टर स्वामी यांनी सोनोग्राफी मशीन घरी नेऊन गर्भलिंग निदान केल्याचा आरोप या महिलेने केला आहे. मुलगी असली तरी चालेल असे पीडित महिलेने सांगितले होते, मात्र आपल्या बोलण्याकडे पती आणि सासूने दुर्लक्ष केले. तसेच पतीने तिला मारहाण केली, असाही आरोप तिने केला आहे. एवढेच नाही तर लै महिन्यात आपण आजारी असताना 15 जुलै रोजी सायंकाळी पुन्हा डॉक्टर स्वामीला घेऊन घरी आले आणि तिला बोलण्यात भुलवून गर्भपाताचे इंजेक्शन दिले असा आरोप या पीडित महिलेने केला आहे. एवढेच नाही तर गर्भाचे पोटात तुकडे करुन ते काढण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

Updated : 26 July 2022 2:30 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top