Home > News Update > भन्नाट ऑफर! भाजपचं ओळखपत्र दाखवा आणि एक लिटर पेट्रोल मोफत मिळवा

भन्नाट ऑफर! भाजपचं ओळखपत्र दाखवा आणि एक लिटर पेट्रोल मोफत मिळवा

भन्नाट ऑफर! भाजपचं ओळखपत्र दाखवा आणि एक लिटर पेट्रोल मोफत मिळवा
X

मुबई : पेट्रोल आणि डिझेलचे भाव गगनाला भिडले आहे, त्यामुळे सर्वसामान्यांचं कंबरड मोडलं आहे. तर या दरवाढीचा निषेध करण्यासाठी शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी एक भन्नाट ऑफर जाहीर केली आहे. ज्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा पाहायला मिळत आहे.

नाईक यांनी, शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त सर्वसामान्यांना शंभर रुपयात 2 लिटर पेट्रोल देण्याची घोषणा केली आहे. याच बरोबर जर भाजपच्या सदस्यत्वाचे ओळखपत्र असेल तर त्या व्यक्तीला 1 लिटर पेट्रोल मोफत दिली जाणार असल्याची घोषणा सुद्धा नाईक यांनी केली आहे.


गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलबरोबरच घरगुती गॅस सिलेंडरचे दर मोठ्याप्रमाणात वाढले आहेत. अनेक जिल्ह्यात पेट्रोलचे दर शंभर पार गेले आहेत. आधीच कोरोनाच्या संकटात सापडलेल्या सर्वसामान्यांना आता दरवाढीचा बोजाही सहन करावा लागत आहे.

Updated : 19 Jun 2021 3:12 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top