Home > News Update > अमरावती जिल्ह्यातील एक लाख शेतकरी पीक विम्यापासून वंचित

अमरावती जिल्ह्यातील एक लाख शेतकरी पीक विम्यापासून वंचित

अमरावती जिल्ह्यातील एक लाख  शेतकरी पीक विम्यापासून वंचित
X

यावर्षी खरिपातील पिकांचा विमा काढण्यासाठी शासनाने नवीन विमा कंपनीची नियुक्ती केली आहे. मात्र, अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मागील हंगामातील पीक विम्याचा परतावा अजूनही मिळाला नाही. काही शेतकऱ्यांना परतावा मंजूर केला. ही नावे देखील कंपनी स्तरावर जाहीर करण्यात आलेली नाही. मागील वर्षी खरीप हंगामात ८८ महसूल मंडळात झालेली अतिवृष्टी आणि ३ महिने असणारा सततचा पाऊस यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे पंतप्रधान पीक विमा योजनेत जिल्ह्यातील २ लाख २१ हजार १०१ शेतकऱ्यांना सहसकट परतावा मिळणे क्रमप्राप्त होते. त्या तुलनेत कंपनीकडून ९९ हजार ९४२ शेतकऱ्यांना ९२.२४ कोटींचा परतावा आला आहे. मात्र, अजूनही जिल्ह्यातील १.१९ लाख शेतकऱ्यांना पीक विमा चा परतावा मिळाला नसल्याने ते शेतकरी वाऱ्यावर आहेत. पीक विमा आणि झालेल्या अतिवृष्टीचा मोबदला शेतकऱ्यांना द्यावा आणि पीक विमा शेतकऱ्यांना मिळायला हवा यासाठी सरकारने कठोर निर्णय घ्यावा यासोबतच शेतकरी आर्थिक संकटात सापडला असल्याने शेतकरी हितार्थ निर्णयाची अंमलबजावणी करावी, जेणेकरून शेवटच्या शेतकऱ्यांना मदत मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

Updated : 11 Aug 2023 9:40 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top