Home > News Update > शंभर टक्के लसीकरण करणार मराठवाड्यातील पहिलं गाव

शंभर टक्के लसीकरण करणार मराठवाड्यातील पहिलं गाव

शंभर टक्के लसीकरण करणार मराठवाड्यातील पहिलं गाव
X

औरंगाबादच्या फुलंब्री तालुक्यातील जानेफळ ह्या छोट्याशा गावची आज मोठी चर्चा होतेय.कारण अवघ्या 525 एवढी लोकसंख्या असलेल्या या गावानं आज लाखो गावांनं कोविड सारख्या संकटाच्या काळात एक नवा आदर्श घालून दिला आहे.

जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनाचा उद्रेक कमी करण्याचे फक्त लसीकरण एकमेव शस्त्र सद्या जगासमोर उपलब्ध आहे, आणि हेच शस्त्र वापरत या गावानं 45 वर्षावरील गावातील शंभर टक्के लसीकरण करून घेतले आहे. त्यामुळे आज हे गाव कोरोनामुक्त गाव म्हणून समोर आलं आहे.


लस घेण्याबाबत सुरवातीला गावकऱ्यांच्या मनात भीती होती. काही लोकांनी कोरोना झालाच नाही तर लस का घ्यावी, असे अनेक प्रश्न उपस्थित केले.तर अनेकांनी लस नकोच म्हणून,विरोधही केला.

मात्र सरपंच, ग्रामसेवक आणि अंगणवाडी सेविका यांनी स्वतः लस घेत, लोकांचं मनपरिवर्तन केलं.एवढच नाही तर,गावकऱ्यांची गावात एक बैठक बोलावली. त्यानंतर गावात फेरी काढून, लोकांना लसीकरणाच महत्व पटवून सांगितले. आणि मग काय गावकऱ्यांमध्ये लसीकरण बाबत एकमत झालं.

गावात सुरवातीला सगळ्यांची अँटीजन टेस्ट करण्यात आली, यावेळी एकही व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आलं नाही. त्यानंतर लगेच गावात लसीकरण शिबीर घेण्यात आला.आणि म्हणता-म्हणता 45 वर्षांवरील पात्र सर्वांनीच लसीकरण करून घेतलं. विशेष म्हणजे,लस घेण्यासाठी गावातील महिला अग्रेसर होत्या.




या गावकऱ्यांनी केवळ आपल्या गावातच नाही तर, आजूबाजूच्या काही खेड्यातील लोकांना देखील एकत्र करून ही लस दिली. त्यामुळे आधी हागणदारीमुक्त आणि आता कोरनामुक्त करणाऱ्या जानेफळ गावाचा आदर्श इतर गावांनी घेतला, तर फक्त गाव-खेड्यातूनच नव्हे तर देशातून कोरोनाला हद्दपार करतात येईल.

Updated : 28 April 2021 1:29 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top