Home > News Update > दिवसाढवळ्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावत पळ, घटना सीसीटीव्हीत कैद

दिवसाढवळ्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावत पळ, घटना सीसीटीव्हीत कैद

दिवसाढवळ्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावत पळ, घटना सीसीटीव्हीत कैद
X

भर दिवसा एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पळ काढणाऱ्या चोरट्याला टिटवाळा पोलिसांनी दोन तासात अटक केली आहे. पोलिसांनी चोरट्याकडून लूटण्यात आलेले दागिने हस्तगत केले आहेत.चोरीचा हा संपुर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाल्याने पोलिसांनी सीसीटीव्हीच्या फुटेजच्या साहाय्याने आरोपीला जेरबंद केले आहे. आरोपीचे नाव रोहीदास शांताराम वेढे असे असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. शुक्रवारी (1 ओक्टोबर) पावणे चार वाजेच्या सुमारास टिटवाळा येथील मांडा परिसरात राहणाऱ्या 32 वर्षीय रिमा ओंकार कुंभार या महिला रस्त्याने चालत जात असतान एक चोरटा रस्त्याच्या एका बाजूला उभा होता. रिमा चालत जात असताना त्या चोरट्याजवळ पोहोचल्या तेव्हा त्याने रिमा यांच्या गळ्यातील दीड तोळे वजनाचे मंगळसूत्र हिसकावत पळ काढला. दरम्यान हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कैद झाला, पोलिसांनी सीसीटीव्हीच्या साहाय्याने वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजू वंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु केला. पोलीस मित्र लिसान काबाडी यांच्या मदतीने या चोरट्याचा पोलिसांना सुगावा लागला. पोलीस सचिन गायकवाड, सुनिल कोर, किरण जाधव या तिघांनी या चोरट्याला ताब्यात घेतले.

Updated : 2 Oct 2021 1:43 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top