आयोध्येतील राम मंदिरासाठी शिवसेनेकडून एक कोटीची देणगी

Courtesy : Social Media

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आयोध्येच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी आयोध्येत उभारल्या जाणाऱ्या राम मंदिरासाठी शिवसेनेकडून १ कोटीची देणगी जाहीर केली आहे. यावेळी मंत्री आदित्य ठाकरे आणि खा. संजय राऊतही उपस्थित होते. महाराष्ट्रीत भाविकांसाठी आयोध्येत महाराष्ट्र भवन बनवण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने जमीन द्यावी असं आवाहन त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ यांना केलंय.

उद्धव ठाकरेंचा हा तिसरा आयोध्या दौरा आहे. नोव्हेंबर २०१८ मध्ये उद्धव ठाकरे हे पहिल्यांदा आयोध्या दौऱ्यावर आले होते. त्यानंतर विधानसभा निवडणुकीआधी त्यांनी आयोध्ये येऊन दर्शन घेतलं होतं. त्यानंतर आता मुख्यमंत्री झाल्याच्या १०० दिवसांनंतर ते आयोध्येला गेले आहेत. कोरोना व्हायरसच्या प्रतिबंधात्मक उपायामुळे उद्धव ठाकरे आज शरयू आरती करणार नाहीत.