Home > News Update > उमेदवार १ हॉलतिकीट ३४, आरोग्य विभागाच्या परीक्षेत पुन्हा गोंधळ

उमेदवार १ हॉलतिकीट ३४, आरोग्य विभागाच्या परीक्षेत पुन्हा गोंधळ

उमेदवार १ हॉलतिकीट ३४, आरोग्य विभागाच्या परीक्षेत पुन्हा गोंधळ
X

परीक्षा आयोजनातील गोंधळामुळे वादग्रस्त ठरलेल्या आरोग्य विभागाच्या ड वर्गाच्या परीक्षेतही पुन्हा गोंधळ होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. आरोग्य विभागाच्या गट ड पदासाठी रविवारी राज्यभरात परीक्षा होणार आहेत. याच परीक्षेसाठी बीडमधील एका उमेदवाराला एक दोन नव्हे, तर तब्बल ३४ हॉलतिकिटे आली आहेत. प्रत्येकावर परीक्षा केंद्र आणि बैठक क्रमांक वेगवेगळा आहे. त्यामुळे आता या विद्यार्थ्या समोर परीक्षा द्यायची कोठे? असा प्रश्न निर्माण झालाय. या निमित्ताने आरोग्य विभागाचा गोंधळ आणि गलथान कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

बीड तालुक्यातील शहाबाजपूर येथे राहणाऱ्या पृथ्वीराज गोरे या विद्यार्थ्याने २० ऑगस्ट रोजी आरोग्य विभागाच्या गट ड पदासाठी ऑनलाइन अर्ज केला होता. यासाठी ६३० रुपये फीसुद्धा भरली होती. यात त्याने औरंगाबाद विभागाची निवड केली होती. गट क पदासाठी २४ ऑक्टोबरला परीक्षा झाली असून, आता गट ड साठी रविवारी परीक्षा होत आहे. परंतु यातही मोठा गोंधळ असल्याचे उघड झाले आहे. या सर्व प्रकारामुळे या विद्यार्थ्याला मनस्ताप सहन करावा लागतोय.

Updated : 28 Oct 2021 12:48 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top