Home > News Update > Corona Update : मुंबईत सलग तिसरा दिवस वीस हजारांपार, 5 रुग्णांचा मृत्यू

Corona Update : मुंबईत सलग तिसरा दिवस वीस हजारांपार, 5 रुग्णांचा मृत्यू

राज्यात कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे. त्यामुळे नागरीक आणि प्रशासनाचे टेन्शन वाढले आहे. त्यातच सलग तिसऱ्या दिवशी मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या 20 हजारांपार गेली आहे. तर 5 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Corona Update : मुंबईत सलग तिसरा दिवस वीस हजारांपार, 5 रुग्णांचा मृत्यू
X

गेल्या 24 तासात मुंबईत 20 हजार 318 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर गुरूवारच्या तुलनेत शुक्रवारी कोरोना रुग्णसंख्या स्थिरावली होती. शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी दिवसभरात 653 नव्या रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. तर सध्या मुंबईतील बेडपैकी 78.4 टक्के बेड शिल्लक आहेत. तर दिलासादायक बाब म्हणजे 82 टक्के रुग्णांमध्ये कोणतेही लक्षणे आढळून आले नाहीत. दरम्यान 24 तासात 6 हजार 3 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

मुंबईतील कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असली तरी मुंबईत रुग्ण बरे होण्याचा दर 86 टक्के इतका आहे. तर रुग्णवाढीचा दर 1.47 टक्के इतका आहे. तसेच रुग्ण दुपटीचा दर हा 47 दिवस झाला आहे. मात्र गेल्या 24 तासात मुंबईत 5 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

शनिवारी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी बीकेसी येथील कोविड केअर सेंटरला भेट देत आरोग्य सुविधांची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी डॉक्टर, रुग्ण आणि आरोग्य यंत्रणेतील संबंधीतांशी संवाद साधला. त्यानंतर महापौर पेडणेकर यांनी कोरोना व Omicron ला नागरीकांनी घाबरून न जाता काळजी घेण्याचे आवाहन केले. तर मुंबईत वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभुमीवर महापालिका प्रशासन सतर्क झाले आहे.




Updated : 8 Jan 2022 2:31 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top