सर्व्हेच्या बहाण्याने नायब तहसीलदाराचेच घर लुटले
X
अमरावती शहरातील राठी नगर परिसरात नायब तहसीलदार प्रशांत अडसुळे यांच्या पत्नी घरात एकट्याच असताना जनगणनेच काम करायला आल्याच सांगत दोन अज्ञात तरुणांनी महिलेला चाकूचा धाक दाखवून पाच लाखाची लूट केल्याची धक्कादायक घटना दिवसा ढवळ्या घडली आहे.
३० जानेवारीला दुपारी अकरा वाजताच्या दरम्यान प्रशांत अडसूळ यांच्या पत्नी घरी एकट्याचं असताना दोन तरुण तोंडाला रुमाल बांधून घरी आले. आम्ही जनगणनेचं काम करायला आलो आहोत, आधार कार्ड दाखवा असे सांगून महिला घरात जाताच तिला चाकूचा धाक दाखवून घरात बांधून ठेवले व घरातील सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम असा पाच लाखाचा ऐवज या चोरट्यांनी दिवसाढवळ्या लुटून नेला. महिलेच्या तक्रारीवरून गाडगे नगर पोलिसांत गुन्हा दाखल केला असून, आरोपींच्या शोधासाठी पोलीस पथक देखील रवाना केलेले आहेत. तोंडाला रुमाल बांधला असल्याने पोलिसांसमोर या आरोपींचा शोधून काढणे, एक आव्हान निर्माण झाले आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून सर्व्हे करायला कोणीही अशा प्रकारे आल्यास घरात आत घेऊ नये व बाहेरूनच माहिती द्यावी असे आवाहन गाडगे नगर पोलीस ठाण्याचे ठाणेदार यांनी केले आहे.






