Home > News Update > नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी शेतकऱ्यांना मिळणार 20 हजार कोटी रुपये, पंतप्रधान मोदींची घोषणा

नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी शेतकऱ्यांना मिळणार 20 हजार कोटी रुपये, पंतप्रधान मोदींची घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2021 मावळत नववर्षाच्या पूर्वसंध्येला एक ट्वीट केलं होत. ज्यात त्यांनी नव्या वर्षातील पहिला दिवस देशाच्या अन्नदात्याला समर्पित करणार असल्याचं सांगितलं. यानुसार आज म्हणजेच 1 जानेवारी 2022 रोजी दुपारी साडेबारा वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे 20 हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणार असल्याचं पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे.

नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी शेतकऱ्यांना मिळणार 20  हजार कोटी रुपये, पंतप्रधान मोदींची घोषणा
X

नवी दिल्ली // पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2021 मावळत नववर्षाच्या पूर्वसंध्येला एक ट्वीट केलं होत. ज्यात त्यांनी नव्या वर्षातील पहिला दिवस देशाच्या अन्नदात्याला समर्पित करणार असल्याचं सांगितलं. यानुसार आज म्हणजेच 1 जानेवारी 2022 रोजी दुपारी साडेबारा वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे 20 हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणार असल्याचं पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे.

नरेंद्र मोदी म्हणाले की , "नववर्ष 2022 चा पहिला दिवस देशाच्या अन्नदात्यांना समर्पित असेन. दुपारी 12 वाजून 30 मिनिटांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पीएम-किसान योजनेचा 10 वा हप्ता जारी करण्याची संधी मिळणार आहे. या अंतर्गत 20 हजार कोटी रुपयांचा 10 कोटीहून अधिक शेतकऱ्यांच्या कुटुंबांना फायदा होईल."

दरम्यान तुम्ही पीएम किसान योजनेसाठी अर्ज केला असेल आणि तरीही तुम्हाला त्या योजनेचा हप्ता मिळत नसेल तर तुम्ही हेल्पलाईन नंबर आणि वेबसाईट दोन्हींच्या माध्यमातून मदत घेऊ शकता. त्यासाठी तुम्ही pmkisan.gov.in या वेबसाईटला भेट देऊ शकता. या वेबसाईटच्या होमपेजवर उजव्या कोपऱ्यात फार्मर्स कॉर्नर (Farmers Corner) आहे. तेथे तुमचा आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक किंवा मोबाईल नंबर यापैकी एक माहिती टाकून तुम्हाला या योजनेचे किती हप्ते मिळाले याचे तपशील मिळतील. फार्मर्स कॉर्नर येथे त्रुटी असलेली माहिती दुरुस्त करण्याचाही पर्याय उपलब्ध आहे. याचा उपयोग करुन तुम्ही तुमचा आधार क्रमांक किंवा इतर काही तपशील अपडेट करु शकता.

Updated : 1 Jan 2022 2:15 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top