Home > News Update > काश्मीर फाईल्सवरून शशी थरूर विरुध्द विवेक अग्निहोत्री ट्वीटर वॉर

काश्मीर फाईल्सवरून शशी थरूर विरुध्द विवेक अग्निहोत्री ट्वीटर वॉर

काश्मीर फाईल्सवरून शशी थरूर विरुध्द विवेक अग्निहोत्री ट्वीटर वॉर
X

द काश्मिर फाईल्स हा सिनेमा चर्चेत आला होता. या चित्रपटावरुन वाद हि रंगला होता. अनेकांनी या सिनेमा एक अजेंडा असल्याचं म्हटलं आहे. आता सिनेमाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री आणि कॉंग्रेस नेते शशी थरुर यांच्यात काश्मीर फाईल्स सिनेमावरुन ट्वीटर वॉर छेडलं गेलं आहे.

'द काश्मिर फाईल्स' मध्ये मुस्लिमांची एकच बाजू दाखवण्यात आली. सिनेमात उगाचच रंगवून गोष्टी दाखवल्या गेल्या आहेत. सिंगापूरच्या न्यूज एशिया टी.व्ही वाहिनीनं दिलेली बातमी शेअर करीत शशी थरुर यांनी ट्वीट लिहिलं आहे,''भारतातील सत्ताधारी पक्षानं प्रमोट केलेल्या 'द काश्मिर फाईल्स' सिनेमांवर सिंगापूरमध्ये बंदी आणण्यात आली आहे''. या ट्वीटच्या माध्यमातून शशी थरुर यांचा निशाणा भाजपाच्या दिशेने होता हे काही यातनं लपून राहिलेलं नाही.

यानंतर विवेक अग्निहोत्री यांनी शशी थरुर यांच्या कमेंटवर उत्तर द्यायला थोडा देखील उशीर केला नाही. त्यांनी शशी थरुर यांना त्यांच्या नेहमीच्या तिखट भाषेत प्रतिउत्तर देताना म्हटलं आहे, ''प्रिय मुर्ख देश,नेहमीच तक्रार करणारा देश,सिंगापूर जगातला सर्वात मोठा मागासलेला सेन्सर आहे. या देशानं तर 'द लास्ट टेम्पटेशन ऑफ जिसस' या सिनेमावर देखील बंदी आणली होती. इतकंच काय तर 'द लीला होटल फाईल्स' या रोमॅंटिक सिनेमावरही बंदी आणली होती. कृपया,काश्मिरमधील हिंदू नरसंहाराची मस्करी उडवणं बंद करा

विवेक अग्निहोत्री यांनी लिहिलं आहे 'हे खरं आहे का की सुनंदा पु्ष्कर या काश्मिरी हिंदू होत्या? मी जोडलेल्या स्क्रीन शॉट मध्ये जे दिसतंय ते खरंय? जर खरं आहे,तर हिंदी पद्धतींनुसार,कोणत्याही मृत व्यक्तीला सम्मान देण्यासाठी तुम्हाला तुमच्या ट्वीटला डिलीट केलं पाहिजे,माफी मागितली पाहिजे''. विवेक अग्निहोत्री ज्या स्क्रीन शॉटविषयी बोलत आहेत ते सुनंदा पुष्कर यांचे जुनं ट्वीट आहे. ज्यामध्ये सुनंदा पुष्कर यांनी त्या काश्मिरी असल्याचं विधान केलं होतं. त्यांनी १९९०-९१ मध्ये काश्मिरमध्ये झालेल्या हिंसेवर आपण आपल्या पतीमुळं हवं तसं मत व्यक्त करु शकलो नव्हतो. असं त्यांनी म्हटलं होतं.

काश्मिर फाईल्स सिनेमा ब्लॉकबस्टर यादीत सामिल झाला आहे. काश्मिरी पंडितांवरील अत्याचार,त्यांचं दुःख,संघर्ष याचं चित्रण 'द काश्मिर फाईल्स' सिनेमातनं करण्यात आलं होतं.

Updated : 10 May 2022 10:27 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top