Home > News Update > संविधानदिनी 'नववधु'ने दिला पाहुण्यांना सल्ला

संविधानदिनी 'नववधु'ने दिला पाहुण्यांना सल्ला

संविधानदिनी नववधुने दिला पाहुण्यांना सल्ला
X

लग्न सराईला नुकतीच सुरुवात झाली आहे. आपलं लग्न हे कसे आनोखे आणि छान होऊ शकते असा विचार आता प्रत्येक जण हा करतच असतो. आताच्या पिढीसाठी लग्न म्हणजे जणु काही एक ट्रेंड आहे. मात्र, या सर्व गोष्टींबरोबरच आपली संस्कृती जपनही तितकच महत्वाच आहे. असाच एक वेगळा उपक्रम वधु व तिच्या कुटुंबियांनी केला आहे. आणि सर्व युवांसाठी आदर्शच उभारला आहे.

संविधान पुस्तिका वाटप

लग्न म्हटलं की खर्च हा आलाच पण लग्न हे पूर्ण रितीरिवाजाणे व आपल्या वरिष्ठांच्या साक्षीने होणे या गोष्टीला आपल्या समाजात जास्त महत्व दिल जात हे बोलायला काही हरकत नाही. या सर्व गोष्टींला महत्व देऊन व आपल्या संविधानला साक्षी मानून नववधुने व तिच्या कुटुंबियाणी लग्नात मोफत संविधान पुस्तिका वाटण्याचा नावा उपक्रम राबावला. २०० संविधान पुस्तिका वाटून वधूने संविधानाचा सन्मानच केला आहे. या आनोख्या समांरभाविषयी नववधु ने सांगितले की , भारतीय संविधान समजुन घेणे ही काळाची गरज आहे. म्हणुन आम्ही या लग्न समारंभात मोफत संविधान पुस्तिकाचे वाटप केले .

चेंबूर, टिळक नगर येथील सर्वोदय महा बुद्धविहार येथे सुधीर रामचंद्र सोनवणे यांची मुलगी श्‍वेता व वसंत सुखदेव गवळी यांचा मुलगा सिद्धांत यांचा विवाह संविधान दिनाचे औचित्यावर रविवारी विवाह सोहळा पार पडला. या वेळी वधूच्या कुटुंबीयांकडून संविधानाच्या २०० प्रती मोफत वाटण्यात आल्या. समारंभात संविधान पुस्तकाचे मोफत वाटप केल्याने उपस्थितांनी कौतुक करण्यात आलं. होणारे अन्याय आणि गैरवर्तन पाहून नक्कीच , आपल्यालाही असच म्हणावे लागेल की संविधान समजून घेणे ही काळाची गरज आहे आणि केवळ समजून न घेता ते जगणं हे तितकच महत्वाचे असल्यांचं सांगण्यात आलं

Updated : 28 Nov 2023 8:06 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top