Home > News Update > Omicron बाधित रुग्ण निगेटिव्ह रिपोर्ट मिळवून भारत सोडून गेला, चौकशी सुरू

Omicron बाधित रुग्ण निगेटिव्ह रिपोर्ट मिळवून भारत सोडून गेला, चौकशी सुरू

Omicron बाधित रुग्ण निगेटिव्ह रिपोर्ट मिळवून भारत सोडून गेला, चौकशी सुरू
X

कर्नाटकमध्ये Omicron व्हेरिएन्टची बाधा झालेले देशातील पहिले दोन रुग्ण आढळले आहेत. या रुग्णांपैकी एक रुग्ण दक्षिण आफ्रिकेचा नागरिक आहे. पण त्याला Omicron ची बाधा झाली असतानाही त्याने तीन चार दिवसात कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट मिळवून तो दक्षिण आफ्रिकेत परत निघून गेला, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. ६६ वर्षांचा हा रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आल्याच्या सात दिवसांच्या आतच एका खासगी लॅबमधून कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट घेऊन निघून गेला असल्याची माहिती समोर आल्याचे वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे.

यासंदर्भात कर्नाटक राज्य सरकारने बंगळुरु महापालिकेला पोलीस तक्रार दाखल करण्याचे आदेश दिले आहेत, तसेच सखोल चौकशीचे केली जाणार असल्याचे जाहीर केले आहे.

प्रकरण नेमके काय आहे?

दक्षिण आफ्रिकेचा नागरिक असलेली ती व्यक्ती २० नोव्हेंबर रोजी बंगळुरूमध्ये दाखल झाली होती, पण विमानतळावरील तपासणीमध्ये ते कोरोना पॉझिटिव्ह आले. त्यानंतर त्यांनी विमानतळाजवळच्या एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये मुक्काम केला. पण २३ नोव्हेंबर रोजी त्यांनी एका खासगी लॅबमधून कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट मिळवला आणि ते २७ नोव्हेंबर रोजी दुबईमार्गे दक्षिण आफ्रिकेला परत निघून गेले. ६६ वर्षांची व्यक्ती ज्यावेळी बंगळुरूमध्ये २० नोव्हेंबर रोजी दाखल झाली तेव्हा पॉझिटिव्ह असली तरी कोणतीही लक्षणं नव्हती, असे कर्नाटकचे आरोग्यमंत्री डॉ. के सुधाकर यांनी गुरूवारी सांगितले होते.

पण त्यानंतर गुरूवारी म्हणजेच २ डिसेंबर रोजी कर्नाटक सरकारने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवलेल्या नमुन्यांमध्ये या व्यक्तीला Omicronची बाधा झाल्याचे समोर आले. पण एका खासगी मेडिकल फर्मचा प्रतिनिधी असलेली ती व्यक्त तोपर्यंत मायदेशी निघून गेली होती.

याप्रकरणात मोठा हलगर्जीपणा झाल्य़ाचे कर्नाटकच्या महसूल मंत्र्यांनी सांगितले आहे. तसेच संबंधित खासगी लॅबने तपासणीमध्ये काही चुका केल्या आहेत का याचीही आता चौकशी केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

संपर्कातील इतरांची तपासणी

या व्यक्तीच्या थेट संपर्कात आलेल्या २४ जणांची आणि अप्रत्यक्षपणे संपर्कात आलेल्या २४० जणांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. तर Omicronची बाधा झालेल्या ४६ वर्षी डॉक्टरने कोणताही परदेश प्रवास केलेला नाही. तर त्यांच्या संपर्कातील आणखी ५ जण पॉझिटिव्ह आले आहेत. एकूणच या प्रकऱणामुळे कोरोना चाचण्यांमधील गोंधळ आणि गैरप्रकारावराचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Updated : 4 Dec 2021 7:41 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top