Home > News Update > एकूण मंत्र्याच्या संख्येत ५० टक्के मंत्री घराणेशाहीचे

एकूण मंत्र्याच्या संख्येत ५० टक्के मंत्री घराणेशाहीचे

एकूण मंत्र्याच्या संख्येत ५० टक्के मंत्री घराणेशाहीचे
X

आज झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात एकूण मंत्र्यांपैकी २२ मंत्री हे घराणेशाहीची पार्श्वभूमी असलेले आहेत. त्यात राष्ट्रवादीचे ९ कॉंग्रेसचे ८ आणि शिवसेना व पुरस्कृत ५ आहेत. एकूण ५० टक्के मंत्री हे घराणेशाहीतून आलेले आहे. १५ पैकी ९ म्हणजे राष्ट्रवादीचे ६० टक्के मंत्री घराणेशाहीचे तर कॉंग्रेस चेही ६० टक्के मंत्री घराणेशाहीचे आहेत. आमदारकीची तिकीटं यांनाच आणि निवडून आल्यावर मंत्रीही हेच होणार. महाराष्ट्रातील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व सर्व पक्षाचे प्रमुख नेते हेच घराणेशाहीतून आल्यामुळे या विषयावर कोणताच पक्ष बोलणार नाही.

1) उद्धव ठाकरे(शिवसेना) --- वडील बाळासाहेब ठाकरे शिवसेनाप्रमुख होते

2) अजित पवार (राष्ट्रवादी) काका शरद पवार माजी केंद्रीय मंत्री मुख्यमंत्री होते

3) जयंत पाटील(राष्ट्रवादी) वडील राजारामबापू पाटील मंत्री होते

4) बाळासाहेब थोरात(कॉंग्रेस) वडील भाऊसाहेब थोरात आमदार व सहकारात होते

5) दिलीप वळसे पाटील (राष्ट्रवादी) वडील दत्तात्रय वळसे हे आमदार होते

6) बाळासाहेब पाटील (राष्ट्रवादी) वडील पी डी पाटील हे आमदार होते

7) राजेंद्र शिंगणे (राष्ट्रवादी) वडील भास्करराव शिंगणे आमदार होते

8) धनंजय मुंढे (राष्ट्रवादी) माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंढे यांचे पुतणे

9) राजेश टोपे (राष्ट्रवादी) वडील अंकुशराव टोपे खासदार होते

10) प्राजक्त तनपुरे (राष्ट्रवादी) जयंत पाटील यांचा भाचा व माजी आमदार प्रसाद तनपुरे यांचा मुलगा.

11) आदिती तटकरे (राष्ट्रवादी) वडील सुनिल तटकरे मंत्री होते

12) अशोक चव्हाण (कॉंग्रेस) वडील शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री होते

13) अमित देशमुख (कॉंग्रेस) वडील विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते

14) सुनील केदार (कॉंग्रेस) वडील बाबासाहेब केदार मंत्री होते

15) यशोमती ठाकूर (कॉंग्रेस) वडील भैय्यासाहेब ठाकूर आमदार होते

16) वर्षा गायकवाड (कॉंग्रेस) वडील एकनाथ गायकवाड खासदार

17) बंटी पाटील (कॉंग्रेस) वडील डी वाय पाटील मंत्री व राज्यपाल

18) विश्वजित कदम (कॉंग्रेस) वडील पतंगराव कदम मंत्री होते

19) आदित्य ठाकरे (कॉंग्रेस) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मुलगा

20) शंभूराजे देसाई (कॉंग्रेस) माजी मंत्री बाळासाहेब देसाई यांचे नातू

21) शंकरराव गडाख (कॉंग्रेस) माजी खासदार यशवंतराव गडाख यांचा मुलगा

22) राजेंद्र पाटील यड्रावकर (अपक्ष) वडील सूतगिरणी चेअरमन होते

हा विषय काढला की नेहमी हे मंत्री नेते अतिशय कार्यक्षम आहेत असे सांगितले जाते. पण त्या पक्षात ज्यांना घराणेशाही पार्श्वभूमी नाही ते मंत्री झाले असते. तर त्यांच्यात अधिक क्षमता असत्या पण संधीच मिळत नाही. आदित्य ठाकरे, आदिती तटकरे यांना कोणताच अनुभव नसताना केवळ घराणेशाही हेच त्यांचे क्वालिफिकेशन ठरते.

तर दुसरीकडे विधानसभा निवडणुकीत मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्राच्या घराणेशाहीचा मी अभ्यास केला असता, त्यात ११६ मतदारसंघात ९४ उमेदवार हे घराणेशाहीतून आलेले होते. तर १९९ साखर कारख्नान्यात ९९ चेअरमन हे घराणेशाहीतून आलेले होते. इतकी ही घराणेशाही खोलवर रुजली आहे.

हेरंब कुलकर्णी

Updated : 30 Dec 2019 4:57 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top