News Update
Home > News Update > #OBCआरक्षणासंदर्भात राज्य सरकारला सुप्रीम कोर्टाचा दणका :निवडणूक जाहीर करण्याचे आदेश

#OBCआरक्षणासंदर्भात राज्य सरकारला सुप्रीम कोर्टाचा दणका :निवडणूक जाहीर करण्याचे आदेश

ओबीसी आरक्षण प्रकरणी सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला दणका दिला आहे.आरक्षणावरुन राज्यात रखडलेला निवडणूक कार्यक्रम दोन आठवड्यात जाहीर करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला दिले आहेत.

#OBCआरक्षणासंदर्भात राज्य सरकारला सुप्रीम कोर्टाचा दणका :निवडणूक जाहीर करण्याचे आदेश
X

ओबीसी आरक्षण प्रकरणी सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला दणका दिला आहे.आरक्षणावरुन राज्यात रखडलेला निवडणूक कार्यक्रम दोन आठवड्यात जाहीर करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला दिले आहेत.

ओबीसी आरक्षणाचा प्रश्न जोवर सुटत नाही तोवर निवडणुका पुढे ढकलण्यासाठी सरकारनं अनेक प्रयत्न केले.पण आजच्या सुप्रीम कोर्टातील सुनावणीत कोर्टाने दोन आठवड्य़ात महाराष्ट्रातील रखडलेल्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करा असे आदेश निवडणूक आयोगाला दिले आहेत.तसेच तत्काळ या निवडणुका घेण्यात याव्यात असंही कोर्टाने म्हटलं आहे.त्यामुळे राज्यातील रखडलेल्या निवडणूकांचा मार्ग मोकळा झाला असला तरी या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय होणार हे आता स्पष्ट झालं आहे.

ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत निवडणुका घेण्यात येऊ नयेत अशी मागणी सर्वच पक्षांची होती. त्यासाठी राज्य सरकारनं वॉर्ड रचना काढली होती. पण तोपर्यंत ओबीसींचा प्रश्न मार्गी लागेल अशी अपेक्षा राज्य सरकारला होती. पण तसं न झाल्यानं राज्य सरकारला झटका बसला आहे

राज्यात जवळपास १४ महापालिका आणि २५ जिल्हापरिषदांसह अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रलंबित आहेत. या निवडणुका २०२० च्या जुन्याच प्रभागरचनेनुसार घेतल्या जाव्यात असे न्यायालयाने आदेश दिले आहेत. एवढच नाही तर निवडणुका सतत पुढे ढकलण्यात आल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाच्या कारभारावर देखील तीव्र नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे.


१५ महापालिका, २१० नगर परिषदा, १० नगर पंचायती आणि १९३० ग्राम पंचायती निवडणूका होणार आहेत. मुंबई पुणे ठाणे उल्हासनगर पिपंरी चिंचवड सोलापूर अकोला अमरावती नागपूर नवी मुंबई औरंगाबाद वसई-विरार कल्याण डोंबिवली आणि कोल्हापूरमधे निवडणुका अपेक्षित आहे.

कोर्टाच्या आदेशामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीचा मार्ग मोकळा झाला आहे. सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला दोन आठवड्यात १५ महापालिकेच्या निवडणूका जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत. ओबीसी आरक्षणा शिवाय या निवडणूका घ्याव्या लागणार आहेत.

यात मुंबई ठाणे पुणे नागपूर उल्हासनगर पिपंरी चिंचवड सोलापूर अकोला अमरावती नवी मुंबई औरंगाबाद वसई-विरार कल्याण डोंबिवली आणि कोल्हापूर यांचा समावेश आहे. याशिवाय २१० नगर परिषदा, १० नगर पालिका आणि १९३० ग्राम पंचायतीच्या निवडणूका होणार आहेत.

राज्य सरकारने डिसेंबर २०२२ पर्यंत अवधी मागितला होता परंतु कोर्टाने अवधी देण्यास नकार दिला. तर पावसाळ्याचे कारण राज्य सरकारनं पुढे केले परंतु आता पुन्हा मुदत वाढविता येणार नसल्याचे कोर्टाने सांगितले. इतर ८ राज्यात निवडणूक वेळापत्रकाचे अधिकार राज्याकडे असल्याचा मुद्दा राज्य सरकारनं पुढे केला परंतु आत्ता महाराष्ट्रातील निवडणूकीचा मुद्दा आहेआणि महापालिकेचा कालावधी संपला आहे.प्रशासकाला ६ महिनेही पूर्ण झाले आहेत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका वेळेतच घ्या असा आदेश सुप्रीम कोर्टानं दिला.

Updated : 2022-05-04T14:27:24+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top