Home > News Update > NSE Scam : देशात खळबळ उडवून देणाऱ्या चित्रा रामकृष्णन यांना अटक, CBI ची मोठी कारवाई

NSE Scam : देशात खळबळ उडवून देणाऱ्या चित्रा रामकृष्णन यांना अटक, CBI ची मोठी कारवाई

नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या माजी सीईओ चित्रा रामकृष्णन यांना तीन दिवसांच्या चौकशीनंतर सीबीआयने अखेर अटक केली आहे.

NSE Scam : देशात खळबळ उडवून देणाऱ्या चित्रा रामकृष्णन यांना अटक,  CBI ची मोठी कारवाई
X

नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या माजी व्यवस्थापकीय संचालक आणि साईओ चित्रा रामकृष्णन यांना सीबीआयने अटक केली आहे. गेल्या 20 वर्षांपासून कथीत हिमालयीन योगीच्या सल्ल्यानुसार नॅशनल स्टॉक एक्सचेंजबाबत चित्रा रामकृष्णन काम करत होत्या. त्याप्रकरणात सीबीआयने तीन दिवसांच्या चौकशीनंतर अखेर चित्रा रामकृष्णन यांना अटक केली आहे.

चित्रा रामकृष्णन या शेअर बाजाराशी संबंधीत महत्वाची माहिती कथीत हिमालयीन योगीला पाठवत होत्या. तर यामधील महत्वाची बाब म्हणजे चित्रा रामकृष्णन या कथीत हिमालयीन योगीला एकदाही भेटल्या नाहीत, अशी धक्कादायक माहिती चित्रा रामकृष्णन यांनी सीबीआयला दिली.

कथीत हिमालयीन योगीला गेल्या 20 वर्षांपासून चित्रा रामकृष्णन माहिती पाठवत असल्याचे उघड झाल्याने देशात मोठी खळबळ उडाली होती. त्याप्रकरणात गेल्या काही दिवसांपासून चित्रा रामकृष्णन यांची सीबीआयकडून चौकशी सुरू होती. दरम्यान विशेष मानसशास्रज्ञांच्या देखरेखीखाली चित्रा रामकृष्णन यांची चौकशी सुरू होती. त्यामध्ये चित्रा रामकृष्णन या खरी माहिती देत नसल्याचे उघड झाले. त्यामुळे चित्रा रामकृष्णन यांना सीबीआयने अटक केली.

चित्रा रामकृष्णन यांनी कथीत हिमालयीन योगीच्या सल्ल्यानुसार आनंद सुब्रमण्यम यांना नोकरीवर घेतले होते. मात्र ज्या व्यक्तीशी चित्रा रामकृष्णन ईमेलवर सल्ला घ्यायच्या तो व्यक्ती आनंद सुब्रमण्यम असल्याचे सिध्द झाले आहे. त्यामुळे चित्रा रामकृष्णन यांनी गोपनिय माहिती लीक केल्याचा आरोप सेबीने केला होता. त्यानंतर ईमेलच्या तपासातून मोठा खुलासा झाला. त्यामुळे सेबीने केलेल्या खुलाशामुळे देशभरात मोठी खळबळ उडाली. मात्र सीबीआयच्या चौकशीत चित्रा रामकृष्णन यांनी खरी माहिती देण्यास टाळाटाळ केल्याने सीबीआयने चित्रा रामकृष्णन यांना अटक केली.

काय आहे प्रकरण :

सेबीने काही दिवसांपुर्वी प्रसिध्दीपत्रक काढून देशात मोठी खळबळ उडवून दिली. त्यामध्ये चित्रा रामकृष्णन या कथीत हिमालयीन योगीच्या सल्ल्यानुसार गेली 20 वर्षे नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये निर्णय घेत होत्या. तर कथीत हिमालयीन योगीच्या सल्ल्यानुसार चित्रा रामकृष्णन यांनी शेअऱ बाजाराचे गृप ऑपरेटींग ऑफिसर आणि सल्लागार आनंद सुब्रमण्यन यांची नियुक्ती केली. हे सेबीच्या तपासातून उघड झाले. त्यामुळे देशात मोठी खळबळ उडाली. तर आनंद सुब्रमण्यन यांची नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या माजी सीईओ चित्रा रामकृष्णन यांचे सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली. तर आनंद सुब्रमण्यन यांनी 2016 मध्ये राजीनामा दिला. त्यानंतर झालेल्या चौकशीत खळबळजनक खुलासे समोर आले.

या प्रकरणात आनंद सुब्रमण्यन यांच्या नियुक्ती प्रकरणी चित्रा रामकृष्णन यांना सेबीने दोषी ठरवले. त्यामध्ये चित्रा रामकृष्णन आणि रवी नारायण यांच्यासह काही व्यक्तींना सुरक्षा कराराच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणे दोषी ठरवले. त्यात रामकृष्ण यांना 3 तर नारायण आणि सुब्रमण्यन यांना 2 कोटी रुपये तर व्ही आर नरसिंहन यांना 6 लाख रुपये दंड ठोठावण्यात आला आहे.

Updated : 7 March 2022 3:03 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top