NRC चा त्रास मुस्लिमांसोबत हिंदू, आदिवासी आणि इतर वंचितांनाही होणार – मुख्यमंत्री

देशभरात NPR लागू करण्यावरून राज्य सरकारची भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केली. NPR ही जनगणना आहे. त्यात काही अडचण असेल असं वाटत नाही, पण तरीही त्यातील कलमे आपण स्वतः अभ्यासणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

CAA आणि NRC हे दोन वेगवेगळे विषय आहेत आणि NPR हा तिसरा विषय आहे. CAA लागू झाल्यानंतर घाबरण्याचे कारण नाहीय. NRC लागू केला तर केवळ मुसलमानांना नाही तर हिंदू, आदिवासी आणि इतर वंचितांना त्याचा त्रास होईल असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय.