Home > News Update > सरकार आणि शेतकऱ्यांच्या बैठकीत तोडगा नाहीच, नवीन प्रस्तावासाठी सरकारने मागितला वेळ

सरकार आणि शेतकऱ्यांच्या बैठकीत तोडगा नाहीच, नवीन प्रस्तावासाठी सरकारने मागितला वेळ

सरकार आणि शेतकऱ्यांच्या बैठकीत तोडगा नाहीच, नवीन प्रस्तावासाठी सरकारने मागितला वेळ
X

केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींमध्ये सुरू असलेल्या चर्चेची पाचवी फेरीसुद्धा निष्फळ ठरली आहे. या बैठकीमध्ये आतापर्यंत कोणताही तोडगा निघालेला नाही. शेतकऱ्यांपुढे आणखी भक्कम प्रस्ताव ठेवण्यासाठी सरकारने वेळ मागून घेतला असून आता पुढची बैठक ९ डिसेंबर रोजी होणार आहे. शनिवारच्या बैठकीत शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींनी फक्त हो किंवा नाही या स्वरुपात उत्तरं दिली आणि कृषी कायदे रद्द कऱण्याच्या मागणीवर असल्याचे सांगितले.

दरम्यान ANI या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांनी या बैठकीमध्ये आणखी आक्रमक भूमिका घेतली. सरकार जर आमच्या मागण्या मान्य करत नसेल तर या बैठकीतून आम्ही निघून जातो, असा इशारा या शेतकरी प्रतिनिधींनी दिलेला आहे. दरम्यान केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी आंदोलन करणाऱ्या महिला, लहान मुलं आणि वृद्धांनी आपापल्या घरी परतावे असे आवाहन केलेले आहे. या बैठकीच्या आधी प्रसारमाध्यमांशी बोलताना शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी "आम्ही पूर्णपणे तयारी करून आलो आहोत आणि इथेच राहणार आहोत. आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर आम्ही परतणार नाही" अशी भूमिका देखील त्यांनी घेतलेली आहे. " एक वर्षभर पुरेल एवढे साहित्य आम्ही आमच्या सोबत आणलेले आहे. गेल्या काही दिवसांपासून आम्ही रस्त्यावर राहत आहोत. जर सरकारला आम्ही रस्त्यावर राहावे असे वाटत असेल तर त्यात आम्हाला काहीही अडचण नाही. पण आम्ही अहिंसेच्या मार्गाने जाणार नाही असा इशारा देखील या शेतकरी प्रतिनिधींनी दिलेला आहे.

Updated : 5 Dec 2020 2:16 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top