Home > News Update > रामलीला आयोजनावरून शिवसेनेशी कोणताही वाद नाही - सुशील व्यास

रामलीला आयोजनावरून शिवसेनेशी कोणताही वाद नाही - सुशील व्यास

रामलीला आयोजनावरून शिवसेनेशी कोणताही वाद नाही - सुशील व्यास
X

Mumbai : रामलीला आयोजनाबाबत शिवसेनेशी कोणताही वाद नाही असे स्पष्टीकरण आझाद मैदानात रामलीला आयोजन करणाऱ्या संस्थेचे अध्यक्ष सुशील व्यास यांनी स्पष्ट केले आहे. गेली 44 वर्षे आम्ही आझाद मैदानात रामलीला आयोजित करत असून यंदाही हे आयोजन यशस्वीपणे करण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले.

आमचा नियोजित कार्यक्रम 23 तारखेपर्यंत असून 24 तारखेला फक्त रावण दहन सोहळा पार पाडतो. मात्र या सोहळ्यासाठी एक ते दीड लाख लोकं जमतात. यंदा इथे दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार असल्याने रावण दहन सोहळा आम्ही कर्नाटक मैदानात घेणार असल्याचे त्यानी सांगितले. हा निर्णय कोणत्याही राजकीय दबावापोटी घेत नसून मुंबई पोलिसांना कायदा आणि सुव्यवस्था हाताळणे सोपे जावे यासाठी घेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे..एकमेकांना विश्वासात घेऊन हा निर्णय घेण्यात आला असून कुणाचा दबाव आल्यामुळे हा निर्णय घेतला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. या निर्णयामुळे आमची परंपरा अजिबात खंडीत होणार नाही असेही त्यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.

Updated : 22 Oct 2023 1:58 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top