Home > News Update > भारतात कोरोनाचा समूह संसर्ग? सरकारने दिली ही माहिती...

भारतात कोरोनाचा समूह संसर्ग? सरकारने दिली ही माहिती...

भारतात कोरोनाचा समूह संसर्ग? सरकारने दिली ही माहिती...
X

देशात दररोज कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पण देशात अजून कोरोनाचा समूह संसर्ग सुरू झालेला नाही, अशी माहिती केंद्रीय आरोग्य विभागाने दिलेली आहे.

केंद्रीय आरोग्य विभागाचे विशेष अधिकारी राजेश भूषण यांनी देशात अजून कोणत्याही प्रकारचा समूह संसर्ग किंवा स्थानिक पातळीवर कोरोनाचा

उद्रेक झालेला नाही अशी माहिती दिलेली आहे. त्याचबरोबर देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांपैकी 80 टक्के रुग्ण हे फक्त 49 जिल्ह्यामध्ये आहेत, अशी माहिती देखील त्यांनी दिलेली आहे. कोरोनाचा समूह संसर्ग किंवा स्थानिक पातळीवरील उद्रेक म्हणजे काय, याची कोणतीही व्याख्या जागतिक आरोग्य संघटनेने अजून केलेली नाही, असेही भूषण यांनी यावेळी सांगितले.

स्थानिक पातळीवरील परिस्थितीचा अभ्यास करून अहवाल तयार करा एवढेच फक्त जागतिक आरोग्य संघटनेने आपल्या सदस्य देशांना सांगितलेला आहे, असंही भूषण यांनी स्पष्ट केले. कोरोनाचा विषाणू हा हवेतून पसरतो का या प्रश्नावर बोलताना परिस्थिती सारखी बदलत आहे आणि जागतिक आरोग्य संघटना यावर लक्ष ठेवून आहे एवढीच प्रतिक्रिया भूषण यांनी दिली.

Updated : 10 July 2020 2:31 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top