Home > News Update > नितीन राऊत आणि सुनिल केदार काँग्रेस कार्यालयातून रागाने बाहेर पडले

नितीन राऊत आणि सुनिल केदार काँग्रेस कार्यालयातून रागाने बाहेर पडले

नागपूर विधान परिषदेच्या निवडणूकीत काँग्रेसचा झालेला पराभव पक्षश्रेष्ठींनी चांगलाच मनावर घेतला आहे. त्या संदर्भात आज दिल्ली येथे बैठक पार पडली.या बैठकीत मंत्री सुनिल केदार आणि मंत्री नितीन राऊत यांना समज देण्यात आल्याचे बोलले जात आहे.

नितीन राऊत आणि सुनिल केदार काँग्रेस कार्यालयातून रागाने बाहेर पडले
X

दिल्ली // नागपूर विधान परिषदेच्या निवडणूकीत काँग्रेसचा झालेला पराभव पक्षश्रेष्ठींनी चांगलाच मनावर घेतला आहे. त्या संदर्भात आज दिल्ली येथे बैठक पार पडली. या बैठकीला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह मंत्री नितीन राऊत आणि मंत्री सुनिल केदार उपस्थित होते.

काँग्रेस महासचिव के सी वेणूगोपाल यांच्या कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीत मंत्री सुनिल केदार आणि मंत्री नितीन राऊत यांना समज देण्यात आली. अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.

नितीन राऊत आणि सुनिल केदार ३५ मिनिटं बैठक संपवून के सी वेणूगोपाल यांच्या कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर रागात होते. नितीन राऊत यांनी यावर बोलण्यास स्पष्ट नकार दिला तर सुनिल केदार म्हणाले पक्ष मोठा आहे.

बाकी कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळे या दोनही नेत्यांना पक्षश्रेष्ठींनी चांगलेच खडेबोल सुनावल्याचं समजतंय.

Updated : 22 Dec 2021 1:28 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top