Home > News Update > मुख्यमंत्री गडकरी भेट: ED संदर्भात चर्चा झाली का? गडकरी म्हणाले..

मुख्यमंत्री गडकरी भेट: ED संदर्भात चर्चा झाली का? गडकरी म्हणाले..

शिवसेनेच्या अनेक नेत्यांना इडीची नोटीस आली आहे. त्यासंदर्भात आज गडकरी आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये चर्चा झाली का? पाहा काय म्हणाले गडकरी

मुख्यमंत्री गडकरी भेट: ED संदर्भात चर्चा झाली का? गडकरी म्हणाले..
X

आज केंद्रीय मंत्री नितिन गड़करी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची भेट घेतली. तसंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक घेतली. या बैठकीत राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प वेळेत करण्यासंदर्भात चर्चा झाली.

या चर्चेनंतर बैठकीत झालेल्या निर्णया संदर्भात गड़करी यांनी पत्रकारांना माहिती दिली. यावेळी पत्रकारांनी शिवसेनेच्या नेत्यांना आलेल्या इडीच्या चौकशी संदर्भात चर्चा झाली का? असा प्रश्न विचारला असता… मी त्या खात्याचा मंत्री नाही. असं म्हणत गडकरी यांनी वेळ मारुन नेली. दरम्यान गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी माझे घरगुती संबंध आहेत. विकास कामांच्या दृष्टीने आजची ही महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, असं गडकरी यांनी म्हटलं आहे.


Updated : 8 Jan 2021 4:11 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top