Home > News Update > नितीन गडकरी यांच्या हस्ते उत्तराखंड मधील टनकपूर येथे 2,217 कोटी रुपयांच्या 8 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची पायाभरणी

नितीन गडकरी यांच्या हस्ते उत्तराखंड मधील टनकपूर येथे 2,217 कोटी रुपयांच्या 8 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची पायाभरणी

नितीन गडकरी यांच्या हस्ते उत्तराखंड मधील टनकपूर येथे 2,217 कोटी रुपयांच्या 8 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची पायाभरणी
X

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज उत्तराखंडमधील टनकपूर येथे 2,217 कोटी रुपये किमतीच्या 8 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची पायाभरणी केली. यावेळी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर धामी, केंद्रीय राज्यमंत्री अजय भट्ट, खासदार अजय तमटा, आमदार आणि अधिकारी उपस्थित होते.

काठगोदाम ते नैनिताल रस्त्याचे 2-पदरी रुंदीकरण केल्याने नैनिताल - मानसखंड मंदिरांशी संपर्क व्यवस्था सुधारेल. काशीपूर ते रामनगर रस्त्याच्या 4 पदरी रुंदीकरणामुळे पर्यटकांना जिम कॉर्बेट नॅशनल पार्क आणि मानसखंड मंदिराला भेट देणे सुलभ होईल. कांगरचिना ते अल्मोडा या रस्त्याच्या दुपदरी रुंदीकरणामुळे बागेश्वरला जाणाऱ्या पर्यटकांची संख्या तर वाढेलच शिवाय त्यांचा वेळही वाचेल. राष्ट्रीय महामार्ग 309A वरील उडियारी बंदपासून कांडा मार्गाचे 2-पदरी रुंदीकरण आणि पुनरुज्जीवन केल्याने बागेश्वरमधील बागनाथ आणि बैजनाथ मंदिरांमध्ये प्रवेश सुकर होईल. तसेच बागेश्वर ते पिथौरागढ हा अवघड प्रवास अधिक चांगला, सुरक्षित आणि कमी वेळात करता येईल.

उत्तराखंडमध्ये उत्कृष्ट पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या उद्देशाने केवळ रस्ते आणि महामार्गांचे काम सुरू नाही, तर लोकांच्या सुरक्षेचा विचार करून राष्ट्रीय महामार्ग 87 च्या विस्तारावर भिंती बांधण्यात येत आहेत अशी माहिती गडकरी यांनी दिली. बागेश्वर जिल्ह्यातील शरयू आणि गोमती नदीवरील दोन पुलांच्या दुरुस्तीचे कामही 5 कोटी रुपये खर्चून केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकल्पांचा केवळ पर्यटकांनाच फायदा होणार नाही तर स्थानिकांनाही प्रवास करणे सोपे होईल. याशिवाय पर्यावरणाची हानी टाळून स्थानिक अर्थव्यवस्थाही मजबूत होईल, असेही त्यांनी नमूद केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही उत्तराखंडच्या विकासासाठी गडकरी यांनी कटिबद्धता व्यक्त केली.




Updated : 13 Feb 2024 6:13 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top