Home > News Update > नितेश राणेंची कोर्टासमोर शरणागती

नितेश राणेंची कोर्टासमोर शरणागती

शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणात संशयित असलेल्या भाजपा आमदार नितेश राणे यांचा जामिन अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळला होता. त्यानंतर त्यांनी हायकोर्टात अर्ज केला होता. पण आता हायकोर्टात केलेला अर्ज मागे घेतला आहे.अर्ज मागे घेऊन सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयात शरण आले आहेत.

नितेश राणेंची कोर्टासमोर शरणागती
X

शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणात संशयित असलेल्या भाजपा आमदार नितेश राणे यांचा जामिन अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळला होता. त्यानंतर त्यांनी हायकोर्टात अर्ज केला होता. पण आता हायकोर्टात केलेला अर्ज मागे घेतला आहे.अर्ज मागे घेऊन सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयात शरण आले आहेत.

सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाने जो निर्णय दिला आहे. त्या निर्णयाचा आदर ठेऊन आपण कोर्टात शरण जात आहोत, असे आमदार नितेश राणे यांनी म्हटले आहे.आतापर्यंत वेगवेगळ्या बेकायदेशीर पद्धीतीने राज्य सरकारने बेकायदेशीर मला अटक करण्याचा प्रयत्न केला.पण मी आज स्वत कोर्टाचा निर्णयाचा आदर ठेऊन कोर्टात शरण जात आहे.न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

दरम्यान कणकवली दिवाणी न्यायालयात नितेश राणे दाखल झाले.चौकशीला सामोरे जाण्यासाठी तयार असल्याचे नितेश राणे यांचे वकील अॅड, सतीश मानशिंदे यांनी सांगितले.नितेश राणेंना अटकेपासुन १० दिवसांचं संरक्षण दिलं आहे.

याच दरम्यान काल जामिन अर्ज फेटाळल्या नंतर न्यायालयाबाहेरच राणे समर्थांमध्ये बाचाबाची झाली.निलेश राणे आणि पोलिंसासमोर आक्रमक झाले.याप्रकरणी निलेश राणेंविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.पोलिसांशी अर्वाच्च भाषेत हुज्जत घातल्याप्रकरणी ओरोस पोलीस ठाण्यात रात्री उशीरा गुन्हा दाखल झाला.

सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीदरम्यान शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावरप १८ डिसेंबरला जीवघेणा हल्ला झाला होता.कारमधुन आलेल्या दोघांनी आपल्यावर शस्त्राने हल्ला केल्याचा दावा संतोष परब यांनी केला होता.या हल्याच्यामागे भाजप आमदार नितेश राणे असल्याचा आरोप संतोष परब यांनी केला होता. संतोष परब हे जिल्हा बॅंक अध्यक्ष सतीश सावंत यांचे निकटवर्तीय आहेत.

Updated : 2 Feb 2022 10:58 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top