Home > News Update > महिला सुरक्षिततेसाठी निर्भय वॉक, गांधी जयंतीनिमित्त घाटकोपरमध्ये वॉक

महिला सुरक्षिततेसाठी निर्भय वॉक, गांधी जयंतीनिमित्त घाटकोपरमध्ये वॉक

महिला सुरक्षिततेसाठी निर्भय वॉक, गांधी जयंतीनिमित्त घाटकोपरमध्ये वॉक
X

महिलांच्या सुरक्षिततेसाठी आणि समाजभान जागविण्यासाठी महात्मा गांधी जयंतीच्या पूर्व संध्येला घाटकोपर मध्ये एका ' निर्भय वॉक ' चे आयोजन करण्यात आले होते.धश्रद्धा निर्मूलन समिती,घाटकोपर ,राष्ट्र सेवा दल,घाटकोपर यांच्या पुढाकाराने तसेच विभागातील विविध सामाजिक संस्था,संघटना आणि इंडिया आघाडीतील घटक पक्षाच्या सहकार्याने भटवाडी,गणेश मंदीर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून घाटकोपर पूर्व येथील रायगड चौक पर्यंत हा निर्भय वॉक काढण्यात आला. महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी,अभिनेत्री चिन्मयी सुमीत यांच्यासहित अनेक जण उपस्थित होते. सुरुवातीला श्रद्धा डान्स अकादमीच्या महिलांनी रस्त्यावर सुंदर असे ' पथ नृत्य ' सादर केले.आमीर काझी,निर्मला माने, सुदाम वाघमारे यांनी चळवळीतील गाणी सादर केली.

Updated : 2 Oct 2024 11:19 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top