Home > News Update > अंबानी धमकी प्रकरण : एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्माच्या घरावर NIAचे छापे

अंबानी धमकी प्रकरण : एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्माच्या घरावर NIAचे छापे

अंबानी धमकी प्रकरण : एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्माच्या घरावर NIAचे छापे
X

मुकेश अंबानी धमकी प्रकरणी NIAने माजी पोलीस अधिकारी आणि एन्काऊन्टर स्पेशालिस्ट म्हणून प्रसिद्ध असलेले प्रदीप शर्मा यांच्यावर कारवाई केली आहे. गुरूवारी सकाळी सहा वाजता NIA ने एनआयकडून प्रदीप शर्मा यांच्या घरावर छापा टाकण्यात आल्याचे वृत्त काही माध्यमांनी दिले आहे. त्यांच्या अंधेरीमधील घरावर हा छापा टाकण्यात आला आहे. अंबानी यांच्या घरोसमोर बॉम्ब ठेवण्याचे प्रकरण आणि त्यानंतर मनसुख हिरेन हत्या प्रकरणी NIA सध्या तपास करत आहे. या प्रकरणी NIAने सचिन वाझेसह काही जणांना आधीच अटक केली आहे. प्रदीप शर्मा यांचीही याआधी चौकशी करण्यात आली होती. या प्रकरणाशी प्रदीप शर्मा यांचा संबंध असावा असा संशय NIAला आहे.

लखनभय्या एन्काऊटर प्रकरणी प्रदीप शर्मा यांनी काही वर्षांपूर्वी अटक झाली होती. तर सचिन वाझे याने प्रदीप शर्मांचा सहकारी म्हणून काम केले आहे. तुरुंगातून सुटून आल्यानंतर शर्मा यांना पुन्हा सेवेत घेण्यात आले. पण त्यानंतर प्रदीप शर्मा यांनी नोकरीचा राजीनामा देत शिवसेनेतर्फे विरारमधून विधानसभा निवडणूक लढवली होती.

Updated : 17 Jun 2021 4:33 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top