Home > News Update > मुकेश अंबानींच्या घराजवळ सचिन वाझे पुन्हा आले...

मुकेश अंबानींच्या घराजवळ सचिन वाझे पुन्हा आले...

मुकेश अंबानींच्या घराजवळ सचिन वाझे पुन्हा आले...
X

मुकेश अंबानी यांच्या घराजवळ गाडीत स्फोटकं सापडल्याच्या प्रकरणाचा तपास सध्या राष्ट्रीय तपास यंत्रणा करत आहे. तपासाचा एक भाग म्हणून NIAने सध्या अटकेत असलेल्या सचिन वाझे यांना पुन्हा एकदा घटनास्थळी आणले. शुक्रवारी रात्री पुन्हा एकदा त्या घटनेचे नाट्यरुपांतर करण्यात आले. या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक व्यक्ती पीपीई किट घालून स्फोटकं ठेवलेल्या गाडीजवळ गेल्याचे दिसले होते. ती व्यक्ती सचिन वाझेच असावेत असा संशय NIAला आहे. त्यामुळे सचिन वाझे यांना कुर्ता घालून त्याच रस्त्यावरुन चालायला लावत त्या घटनेचे नाट्यरुपांतर करण्यात आले. यासाठी NIA आणि फॉरेन्सिक टीमने अँटिलियाचा परिसर काही वेळासाठी ब्लॉक केला होता. तसेच त्याच ठिकाणी हा सीन रिक्रिएट करण्यात आला. जवळपास अर्धा तास हे सीन रिक्रिएरट करण्याचे काम सुरू होते.

ज्या गाडीमध्ये स्फोटकं आढळली होती, त्या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. यानंतर सचिन वाझे आणि हिरेन हे आधीपासून संपर्कात होते ही माहिती समोर आली. तसेच सचिन वाझे यांनी या प्रकरणात पोलिसांचे वाहन वापरल्याचेही उघड झाले होते. त्यामुळे स्फोटकं प्रकरणात सचिन वाझे यांचाच हात असल्याचा संशय बळावला आहे. यासर्व पार्श्वभूमीवर NIA तपास हातात घेतल्यानंतर सचिन वाझे यांना अटक करण्यात आली आहे.

Updated : 20 March 2021 6:06 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top