Live : मतदानाचा सातवा टप्पा, वाचा महत्त्वाच्या लढती
Max Maharashtra | 19 May 2019 11:13 AM IST
X
X
१७ व्या लोकसभेच्या निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. या सातव्या टप्प्यात देशातील एकूण ५९ जागांसाठी मतदान होणार आहे. या शेवटच्या टप्पयातील महत्वाच्या लढतीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी मतदार संघातून निवडणूक लढत आहेत. त्यांच्या विरोधात कॉंग्रेसने अजय राय यांना उमेदवारी दिली आहे. तर समाजवादी पक्षाने शालिनी यादव यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या मतदारसंघाकडे सर्वाचं लक्ष राहणार आहे.
इतर महत्त्वाच्या लढती
गोरखपूर (उत्तर प्रदेश)
भाजप - रवी किशन, प्रसिद्ध अभिनेते
सपा-बसपा -राम भुआल निषाद
कॉग्रेस - मधुसूदन तिवारी
पटना साहिब (बिहार)
भाजप - केंद्रीय मंत्री रवीशंकरप्रसाद
काँग्रेस - शत्रुघ्न सिन्हा
२०१४ मध्ये कोणत्या पक्षाला किती जागा?
उत्तर प्रदेश – १३: भाजप ११, सप १, अपना दल १
पश्चिम बंगाल -९ : तृणमूल काँग्रेस ९
बिहार- ८ : भाजप ५, जनता दल (सं) १, राष्ट्रीय लोक समता पक्ष २
चंडीगड -१ : भाजप १
हिमाचल प्रदेश -४ : भाजप ४
झारखंड- ३: झारखंड मुक्ती मोर्चा २, भाजप १
मध्य प्रदेश – ८ : भाजप ७, काँग्रेस १
पंजाब- १३ : शिरोमणी अकाली दल ४, काँग्रेस ४, आप ४ , भाजप १
कोणत्या राज्यात किती मतदारसंघात मतदान?
उत्तर प्रदेशमध्ये एकूण १३ मतदारसंघात मतदान होत आहे. यामध्ये महत्त्वाच्या लढतींचा विचार केला तर गाझीपूर लोकसभा मतदारसंघातून केंद्रीय मंत्री मनोज सिन्हा निवडणूक लढवत आहेत. त्यांच्यासमोर आघाडीचे उमेदवार अफजाल अन्सारी मैदानात आहेत.
मतदार संघ
गोरखपूर, वाराणसी, महाराजगंज, कुशीनगर, देवरिया, बांसगांव, घोसी, सालेमपुर, बलिया, गाझीपूर, चन्दौली, मिर्झापूर आणि रॉबर्ट्सगंज
पश्चिम बंगाल
७ व्या टप्प्याच्या मतदानासाठी निवडणुकीचं केंद्र राहिलेल्या पश्चिम बंगालमध्ये एकूण 9 मतदारसंघात निवडणूक होत आहे. कोलकाता दक्षिण, कोलकाता उत्तर, डमडम, बारासात, बशीरहाट, जयनगर, मथुरापुर, डायमंड हार्बर आणि जादवपुर या मतदार संघात निवडणूक होत आहे.
पंजाब
पंजाबमध्ये देखील १३ जागांसाठी मतदान होत आहे. या १३ मतदार संघामध्ये महत्वाच्या लढतींचा विचार केला तर केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी अमृतसरमधून निवडणूक लढत आहेत. तर दुसरीकडे गुरदासपूरमधून अभिनेता सनी देओल भाजपच्या तिकिटावर आपलं नशिब आजमावत आहे.
बिहार
बिहारच्या ८ जागांचा विचार केला तर यामध्ये पटना साहिब मतदारसंघामध्ये केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांच्याविरुद्ध काँग्रेसचे शत्रुघ्न सिन्हा निवडणूक लढवत असून या निवडणुकीकडे देशाचं लक्ष लागलं आहे. तर दुसरीकडे काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी लोकसभा अध्यक्ष मीरा कुमार सासाराम मतदार संघातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
मतदारसंघ
पटना साहिब, सासाराम, नालंदा, पाटलीपुत्र, आरा, बक्सर, काराकट आणि जहानाबाद.
मध्य प्रदेश
इंदौर, देवास, उज्जैन, मंदसौर, खरगौन, खंडवा, रतलाम आणि धार या आठ मतदारसंघात आज मतदान होत आहे.
झारखंड
झारखंडमध्ये एकूण ३ जागांसाठी मतदान होत आहे. यामध्ये दुमका, राजमहल, गोड्डा या मतदार संघाचा समावेश आहे
हिमाचल प्रदेश
हिमाचल प्रदेशमध्ये शिमला, हमीरपूर, मंडी आणि कांग्रा या मतदार संघात मतदान होत आहे.
चंदीगढ
या केंद्रशासीत प्रदेश मधून अभिनेता अणुपम खेर यांची पत्नी अभिनेत्री किरण खेर या भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
Updated : 19 May 2019 11:13 AM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire