Home > News Update > जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीसांनी काढली आव्हाडांची अक्कल म्हणाले; बदनाम हुये तो हुये पर नाम तो….

जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीसांनी काढली आव्हाडांची अक्कल म्हणाले; बदनाम हुये तो हुये पर नाम तो….

जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीराम यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर देवेंद्र फडणवीसांनी हल्ला बोल केला. ते म्हणाले जितेंद्र आव्हाड यांनी केलेलं वक्तव्य म्हणजे मुर्खपणा आहे आणि केवळ प्रसिद्धी मिळवण्याकरता आहे. अशी प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दीली. पुढे फडणवीस असेही म्हणाले, बदनाम हुये तो हुये....

जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीसांनी काढली आव्हाडांची अक्कल म्हणाले; बदनाम हुये तो हुये पर नाम तो….
X

Pune : जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीराम यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर देवेंद्र फडणवीसांनी हल्ला बोल केला. ते म्हणाले जितेंद्र आव्हाड यांनी केलेलं वक्तव्य म्हणजे मुर्खपणा आहे आणि केवळ प्रसिद्धी मिळवण्याकरता आहे. अशी प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली


दरम्यान यांसर्भात फडणवीस असेही म्हणाले, बदनाम हुये तो हुये पर नाम तो हुआ, असं हिंदीमध्ये एक वाक्य आहे. त्याप्रकारे ते करत असतात. त्याचा असा स्वभाव आहे. प्रभू श्रीराम सर्वांचे आहे. असं कोणीच नाही त्यांचे प्रभू श्रीराम नाही.? असा सवाल करत देवेंद्र फडणवीस पुढे असेही म्हणाले की, उगाचच केवळ मासांहारी आणि शाकाहारी असं म्हणत लोकांच्या भावनांना ठेच पोहोचवण्याचं काम आहे. तर टाळकरी, वारकरी, धारकरी, माळकरी हे सगळे बहुजन समाजाचे असून ते प्रभू श्रीरामांना मानतात आणि हे सगळे लोकं शाकाहारी आहेत. यांचाही हा अपमान आहे. त्यामुळे विनाकारण वाद निर्माण करणं, लोकांच्या भावना दुखावणं आणि अशांतत निर्माण होईल असं वागणं हे अत्यंत चुकीचं असल्याचे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर हल्लाबोल केला.

Updated : 6 Jan 2024 11:56 AM IST
Next Story
Share it
Top