देशात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. महाराष्ट्रसह पंजाब, दिल्ली या राज्यात रुग्णांची संख्या अधिक आहें. तर देशातील इतर राज्यात कोरोनाला रोखण्यासाठी अनेक शहरांमध्ये लॉकडाऊन लावण्यात आला आहे. त्यातच देशात कोरोना लसीची कमतरता जाणवत आहे. अशा परिस्थितीत जगाने देखील भारताच्या वाढत्या कोरोना संख्येचा धसका घेतला आहे.
न्युझीलॅंड च्या पंतप्रधान जैसिंडा आर्डेन यांनी भारतीयांना न्युझीलॅंडमध्ये प्रवेश बंदीची घोषणा केली आहे. एका वृत्त एजन्सीच्या माहितीनुसार भारतीयांना न्युझीलॅंडमध्ये 11 एप्रिल ते 28 एप्रिल पर्यंत बंदी घालण्यात आली आहे.
Updated : 8 April 2021 5:01 AM GMT
Next Story