Home > News Update > सिनेसृष्टीला सुरक्षित वातावरण देण्यासाठी नवीन फिल्मसिटी- योगी आदित्यनाथ

सिनेसृष्टीला सुरक्षित वातावरण देण्यासाठी नवीन फिल्मसिटी- योगी आदित्यनाथ

New Film City to give a safe environment to Cineworld says Uttar Pradesh Chief Minister Yogi Adityanath

सिनेसृष्टीला सुरक्षित वातावरण देण्यासाठी नवीन फिल्मसिटी- योगी आदित्यनाथ
X

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुंबईत येऊन उत्तर प्रदेशातील नवीन फिल्मसिटीची घोषणा केली आहे. बॉलिवूड ही काही पर्स नाही कुणीही उचलून घेऊन जायला. उलट आम्ही नवीन सुविधांसह फिल्मसिटी बांधत आहोत, असे त्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. बॉलिवूडमधील काही जणांशी चर्चा केल्याचंही त्यांनी यावेळी सांगितले.

संजय राऊत यांच्या टीकेला उत्तर देताना त्यांनी सांगितले की मी इथून काही घेऊन जायला आलेलो नाही तर अत्याधुनिक सुविधा असलेली फिल्मसिटी निर्माण करुन रोजगाच्या संधी उपलब्ध करुन देणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोब बॉलिवूडला सुरक्षित वाटले पाहिजे अशी इंडस्ट्री निर्माण करणार असल्याचा टोला त्यांनी यावेळी लगावला.


Updated : 2 Dec 2020 12:18 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top